मॅकडोनाल्ड करणार चीनमध्ये विस्तार

वृत्तसंस्था
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

शांघाय : मॅकडोनाल्ड कंपनी चीनमधील रेस्टॉरंटची संख्या 2022 पर्यंत साडेचार हजारांवर नेणार आहे. सध्या कंपनीची चीनमध्ये अडीच हजार रेस्टॉरंट आहेत.

शांघाय : मॅकडोनाल्ड कंपनी चीनमधील रेस्टॉरंटची संख्या 2022 पर्यंत साडेचार हजारांवर नेणार आहे. सध्या कंपनीची चीनमध्ये अडीच हजार रेस्टॉरंट आहेत.

मॅकडोनाल्डने सिटिक आणि कार्लाईल समूहासोबत चीनमध्ये भागीदारी केली होती. चीनमध्ये पुढील पाच वर्षांमध्ये दरवर्षी दोन आकडी वाढ करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. मॅकडोनाल्डने जुलैमध्ये चीन आणि हॉंगकॉंगमधील व्यवसायात भागीदारीसाठी सिटिक आणि कार्लाईल समूहाशी करार केला आहे. यानुसार मॅकडोनाल्डच्या चीन व हॉंगकॉंगमधील व्यवसायात सिटिकचा 52 टक्के आणि कार्लाईलचा 28 टक्के हिस्सा असणार आहे. चीनमध्ये कंपनीने आक्रमकपणे विस्तार करण्याचे धोरण आखले आहे. त्यामुळे देशातील रेस्टॉरंटची संख्या पुढील पाच वर्षांत दुपटीने वाढविण्याचे पाऊल कंपनीने उचलले आहे. अमेरिकेनंतर चीन ही सर्वांत मोठी बाजारपेठ असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

Web Title: china news mcdonalds in china