चीनमध्ये सहा खाण कामगारांचा मृत्यू

पीटीआय
गुरुवार, 25 मे 2017

खाणीच्या पाण्यातून वाचलेल्या पाच जणांवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

बीजिंग : उत्तर चीनमध्ये एका कोळसा खाणीत पुराचे पाणी शिरल्याने सहा खाण कामगारांचा मृत्यू झाला, तर पाच जणांना वाचवण्यात यश आले.

वृत्तसंस्थेनुसार बचावकार्य बुधवारी सकाळपर्यंत सुरू होते. खाणीच्या पाण्यातून वाचलेल्या पाच जणांवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

किंगझु प्रांतातील एका कोळसा खाणीत मंगळवारी पाणी भरल्याने 11 कामगार अडकले होते.

Web Title: china news six mine workers die