"भारत-पाक सीमा सीलबंद': चीन संतप्त

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 ऑक्टोबर 2016

बीजिंग - पाकिस्तानबरोबरील सीमारेषा पूर्णपणे "सीलबंद‘ करण्याचा भारताचा निर्णय हा "अत्यंत अतार्किक‘ असल्याची टीका ग्लोबल टाईम्स चीनमधील सरकारी मालकीच्या वृत्तपत्राच्या माध्यमामधून करण्यात आली आहे. याचबरोबर, चीन व पाकिस्तानमधील "सार्वकालिक मैत्री लक्षात घेता भारताच्या या निर्णयामुळे भारत-चीन संबंध अधिक जटिल होण्याचा इशाराही या वृत्तपत्रामधून देण्यात आला आहे. 
 
"उरी येथील दहशतवादी हल्ल्याचा सखोल तपास न करताच भारताने हा अत्यंत अतार्किक निर्णय घेतला आहे. या दहशतवादी हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा सहभाग असल्याचा कोणताही पुरावा नाही,‘‘ असे येथील सरकारी थिंक टॅंकमधील विचारवंत हु झियोंग यांनी म्हटले आहे. भारताचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गेल्या शुक्रवारी भारत व पाकिस्तानमधील 3,323 किमी लांबीची सीमारेषा डिसेंबर 2018 पर्यंत पूर्णपणे सीलबंद करण्याची घोषणा केली होती. या पार्श्‍वभूमीवर चीनने ही भूमिका स्पष्ट केली आहे.

भारताच्या या निर्णयामुळे दोन देशांमधील आधीच रखडत सुरु असलेला व्यापार आणखी बाधित होईल; व द्विपक्षीय चर्चाही थांबेल, अशी "काळजी‘ हु यांनी व्यक्त केली आहे. किंबहुना ,भारताच्या या निर्णयामधून या देशाची "शीतयुद्धकालीन मानसिकता‘ दिसून येत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

Web Title: China reacts strongly to sealing of India-China border