अमेरिकन क्षेपणास्त्रांच्या वर्चस्वास चीनचे आव्हान

वृत्तसंस्था
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

या क्षेपणास्त्राचे वजन 20 किलो इतके असून त्यावर 5 किलो स्फोटके वाहून नेणे शक्‍य आहे. या क्षेपणास्त्राचा पल्ला 8 किमी इतका असून कमाल वेग ताशी 735 किमी इतका आहे

बीजिंग - हवेतून जमिनीवर मारा करणारी कमी पल्ल्याची क्षेपणास्त्रे इतर देशांना विकण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय चीनने घेतला आहे. दहशतवादविरोधी मोहिमेमध्ये वापरण्यात येणाऱ्या "ड्रोन्स'वर ही क्षेपणास्त्रे बसविता येणे शक्‍य असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

वायव्य चीन भागामध्ये "एआर-2' या क्षेपणस्त्रांची चाचणी नुकतीच घेण्यात आल्याचे "चायना ऍकॅडमी ऑफ एरोस्पेस एरोडायनॅमिक्‍स' या कंपनीने म्हटले आहे. अमेरिका, फ्रान्स व इस्राईलकडून निर्मिती करण्यात येत असलेल्या अशा स्वरुपाच्या क्षेपणस्त्रांशी चिनी "एआर-2'कडून तीव्र स्पर्धा करण्यात येत असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. या क्षेपणास्त्राचे वजन 20 किलो इतके असून त्यावर 5 किलो स्फोटके वाहून नेणे शक्‍य आहे. या क्षेपणास्त्राचा पल्ला 8 किमी इतका असून कमाल वेग ताशी 735 किमी इतका आहे. घरे, बंकर, वाहने अशा लक्ष्यांवर हल्ला करण्यासाठी एआर 2 उपयुक्त असल्याचे मानले जात आहे.

अमेरिकेच्या "एजीएम 114 हेलफायर' या क्षेपणास्त्रास या एआर 2 कडून मोठी स्पर्धा निर्माण केली जाईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 1990 व 2000 या दशकांत "हेलफायर'चा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला होता.

Web Title: China to sell new short-range missile to foreign countries