Shenzhou : प्राध्यापकाला पाठविले अवकाशस्थानकात; चीनच्या ‘शेंझोऊ’चे यशस्वी प्रक्षेपण

पाच महिन्यांच्या मोहिमेसाठी एका सामान्य व्यक्तीला अवकाशात पाठविण्याची ही पहिलीच वेळ आहे.
china successfully launches new manned spaceship Shenzhou with first civilian on board
china successfully launches new manned spaceship Shenzhou with first civilian on boardsakal

बीजिंग : चीनने आज शेंझोऊ-१६ या अवकाशायानाचे यशस्वी प्रक्षेपण केले. चीनच्या अवकाशस्थानकाच्या दिशेने झेपावलेल्या या अवकाशयानात तीन अंतराळवीर असून त्यापैकी एक जण सामान्य नागरिक आहे.

पाच महिन्यांच्या मोहिमेसाठी एका सामान्य व्यक्तीला अवकाशात पाठविण्याची ही पहिलीच वेळ आहे. गुई हैचाओ असे या व्यक्तीचे नाव असून ते बीजिंगमधील बेहांग विद्यापीठात प्राध्यापक आहेत.

चीनच्या वायव्य भागातील जिऊक्वान उपग्रह प्रक्षेपण केंद्रावरून आज सकाळी ‘लाँग मार्च-२एफ’ या प्रक्षेपकाच्या मदतीने ‘शेंझोऊ-१६’चे प्रक्षेपण करण्यात आल्याची माहिती चीनच्या अवकाश संशोधन संस्थेने (सीएमएसए) दिली. प्रक्षेपणानंतर दहा मिनिटांनी अवकाशयान प्रक्षेपकापासून विलग होऊन नियोजित कक्षेत पोहोचले.

प्रक्षेपणानंतर सात तासांनी हे यान चीनच्या अवकाशस्थानवर जाऊन पोहोचले. पृथ्वीपासून चारशे किलोमीटर उंचीवर असलेल्या या अवकाशस्थानकाच्या तिआन्हे मोड्यूल या भागात तिन्ही अंतराळवीर राहणार आहेत.

china successfully launches new manned spaceship Shenzhou with first civilian on board
China Corona Update चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला; नव्या लाटेची शक्यता

प्राध्यापक गुई हैचाओ हे अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. अंतराळवीरांव्यतिरिक्त अवकाशात उड्डाण करणारे ते पहिले चिनी व्यक्ती ठरले आहेत. तसेच, या मोहिमेचे प्रमुख जिंग हेपेंग यांची चौथ्या वेळेस अवकाशात जाणारे पहिले चिनी अंतराळवीर म्हणून नोंद झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com