
जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोना व्हायरसबद्दल पुन्हा धक्कादायक माहिती समोर आली आहे. चीनच्या प्रमुख व्हायरोलॉजिस्ट शी झेंगली यांनी केलेल्या दाव्याने पुन्हा एकदा सगळ्या जगाची चिंता वाढली आहे. बॅटवुमन म्हणून प्रसिद्ध असलेल्या चीनच्या प्रमुख व्हायरोलॉजिस्ट यांनी भविष्यात आणिखी एक कोरोना व्हायरसचा सामना करावा लागू शकतो असा दावा केला आहे. त्यांनी नुकतेच प्रसिद्ध केलेल्या रिसर्च पेपरमध्ये याबद्दल भाष्य केलं आहे. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत याबद्दल रिसर्च केला आहे.
साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, हा दावा त्यांच्या अभ्यासाच्या आधारावर करण्यात आला आहे. करण कोरोना व्हायरस पहिल्यांतृदा २००३ सीव्हियर एक्यूच रेस्पिरेटरी सिंड्रोम (SARS) आणि कोविड-१९ महामारीचे कारण ठरला आहे.
वुहान इंस्टीट्यूट ऑफ व्हायरोलॉजी येथील अभ्यासक शी झेंगली आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ४० विविध कोरोना व्हायरस प्रजातींचे मुल्यांकन केले आहे. यामध्ये अर्धा प्रजाती अत्यंत जोखमीच्या आहेत. तसेच रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की यापैकी सहा प्रजातींनी आधीच मानवांमध्ये रोग निर्माण केले होते आणि इतर तीनमुळे प्राण्यांना संसर्ग झाला होता.
शी झेंगली आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या प्रयोगांनंतर अनेक दावे करण्यात आले आहेत. या संशोधनाच्या परिणामांनुसार, भविष्यात हा आजार उद्भवणे जवळजवळ निश्चित असल्याचे सांगण्यात आले आहे. ज्यामध्ये कोरोना व्हायरसचा प्रकोप पुन्हा एकदा होण्याची शक्यता खूप जास्त आहे. हा दावा विविध व्हायरल विश्लेषनानंतर करण्यात आला आहे, ज्यामध्ये लोकसंख्या गतिशीलता, अनुवांशिक विविधता, होस्ट प्रजाती आणि झुनोटिक ट्रान्समिशनची पार्श्वभूमी (प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरणारे रोग) यांचा समावेश आहे.
दरम्यान शी झेंगली यांच्या शोधावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विशेषतः अमेरिकेच्या अधिकाऱ्यांना संशय आहे की कोविड-१९ वुहान इंस्टीट्यूट ऑफ व्हायरोलॉजीमधये लीक झाल्याने पसरला होता. जेथे शी झेंगली काम करत आहेत.
जूनमध्ये प्रसिद्ध झालेल्या अमेरिकन गुप्तचर दस्तऐवजानुसार, संशोधनादरम्यान कोविड-१९ लीक झाल्याची पुष्टी झालेली नाही, मात्र हे नाकारता देखील येत नाही. चीनच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रातील एका शास्त्रज्ञाने चीनच्या COVID-19 हाताळणीत बदल केल्याबद्दल माहिती दिली आहे. यावरून असे दिसून येते की चीनी अधिकारी व्हायरसचे महत्त्व कमी करत आहेत. तसेच चीनमध्ये काही शहरांमध्ये बदल संसर्ग डेटा जारी करणे थांबवण्यात आले आहे.