Chinese Spy Balloon : अमेरिकेची मोठी कारवाई, हवेतच नष्ट केला चिनी स्पाय बलून; चीनकडून नाराजी व्यक्त

अमेरिकेच्या कारवाईनंतर चीनकडून तीव्र नाराजी व्यक्त
Chinese Spy Balloon
Chinese Spy Balloon esakal

चीनचा हेरगिरी करणारा कथित बलूनवर अमेरिकेने मोठी कारवाई केली आहे. गुरुवारी अमेरिकेच्या मोंटानात दिसलेला संशयास्पद चिनी बलून काल पेंटागॉनकडून पाडण्यात आला. त्यानंतर चीनने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तो हेरगिरी करणारा बलून नसून ते एक मार्गापासून भटकलेले नागरी एअरशीप होते. असं चीनने म्हटले आहे.

अमेरिकेने चीनच्या या बलूनला हवेतच उडवले आहे. या कारवाईचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये बलून खाली येताना दिसत आहे. बलून नष्ट केल्यानंतर तो समुद्राच्या पाण्यातच पडावा असे नियोजन करण्यात आले होते.

तसेच, अवशेष भाग जमा करण्यासाठी समुद्रात जहाजे तैनात करण्यात आली होती. जहाजांच्या माध्यमातून बलूनचे जास्तीत जास्त अवशेष जमा करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

हा बलून सर्वांत अगोदर २८ जानेवारी रोजी अमेरिकेच्या हवाई हद्दीत आढळला होता. न्यूज एजेंसी एएफपीनुसार अमेरिकेत आकाशात एक चीनी स्पाय बलून अचानक उडताना दिसला. जो एअरबेस आणि स्ट्रॅटेजिक मिसाइल ज्या जागी असतात अशा संवेदनशील क्षेत्रात उडत होता.

अमेरिकेच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले की अमेरिकी सैनिक बलूनला खाली पाडण्याचा विचार करत होते मात्र त्यांना या गोष्टीची भीती होती की यामुळे लोकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. अखेर अमेरिकेने कारवाई केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com