Elon Musk : इलॉन मस्कला चीनने दिला दणका!

कोविड महामारी चीनच्या वुहान येथील लॅबमधून जगभरात पसरली
Elon Musk News
Elon Musk NewsSakal

Elon Musk : टेस्ला कंपनीचे सीईओ इलॉन मस्क यांना अमेरिकेच्या यूएस डिपार्टमेंट ऑफ  एनर्जी लो कॉन्फिडेंस मूल्यांकनावर अहवाल शेअर केल्यानंतर एका चीनी सरकारी वृत्तपत्राने इशारा दिला आहे, मूल्यांकनात असे म्हटले आहे की कोविडचा जागतिक प्रसार चीन मधील वुहान शहरातील एका प्रयोगशाळेत झाला.

सीएनबीसीच्या युनिस यून या ग्लोबल टाइम्सच्या सोशल मीडियावरून एक पोस्ट केली आहे की, ही सरकार-नियंत्रित पीपल्स डेलीची इंग्रजी-भाषेची उपकंपनी आहे. ग्लोबल टाइम्सने टेस्ला आणि ट्विटरचे सीईओ एलाॅन मस्कला इशारा दिला आहे की ते चीनबद्दल चुकीची माहिती पसरवत आहेत. ट्विटला उत्तर देताना एलाॅन मस्क यांनी सांगितले होते की, कोविड महामारी चीनच्या वुहान येथील लॅबमधून जगभरात पसरली होती.

Elon Musk News
कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

यूनचा अहवाल आणि एका हिंदी म्हणीत असे म्हटले आहे की, उसी हाथ को काटना जो आपको खिलाता है. चीनच्या शांघायमध्ये टेस्ला कंपनीचा मोठा कारखाना आहे आणि दुसरीकडे, इलेक्ट्रिक वाहन उत्पादकांसाठी चीन हा दुसरा सर्वात मोठा बाजार आहे. यूएस डिपार्टमेंट ऑफ  एनर्जी लो कॉन्फिडेंस मूल्यांकनामध्ये, असे सांगण्यात आले आहे की ,

कोविड वुहान लॅबमधून बाहेर आला जो जगभरात पसरला, परंतु या प्रकरणाशी परिचित असलेल्या सूत्रांनी एनबीसी न्यूजला सांगितले की या प्रकरणातील निष्कर्ष महत्त्वाचा मानला जात नाही.

2021 च्या सुरुवातीला, FBI कमी आत्मविश्वास पातळीसह समान निष्कर्षापर्यंत पोहोचली होती. मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरचे नवीन मालक इलॉन मस्क यांच्याकडून सध्या या प्रकरणी कोणतेही वक्तव्य आलेले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com