दलाई लामा 'अरुणाचल'मध्ये नकोच: चीन

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2016

बीजिंग: तिबेटचे सर्वोच्च धर्मगुरु दलाई लामा यांना अरुणाचल प्रदेशमध्ये प्रवेश दिल्यास त्याचा भारत आणि चीनमधील संबंधांवर विपरित परिणाम होईल, असा इशारा चीनने आज (शुक्रवार) दिला. चीनच्या मते अरुणाचल प्रदेश हा तिबेटचाच भाग आहे आणि तिबेटवर चीनचे ताबा मिळविलेला आहे. 

अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दलाई लामा यांना भेटीचे निमंत्रण दिले आहे. येथे जाण्यासाठी केंद्र सरकारने दलाई लामा यांना परवानगीही दिली आहे. यावरून चीनने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते ल्यु कॅंग म्हणाले, "दलाई लामा यांच्या प्रस्तावित भेटीच्या माहितीकडे आम्ही गांभीर्याने पाहत आहोत. या भागाविषयीची चीनची भूमिका स्पष्ट आहे. दलाई लामा हे चीनविरोधी कारवायांमध्ये सहभागी आहेत. भारत-चीन सीमाप्रश्‍नाविषयीही त्यांची भूमिका संशयास्पद आहे.‘‘ 

या परिस्थिती भारतीय अधिकाऱ्यांनाही पुरेशी कल्पना असल्याचे कॅंग यांनी सांगितले. ‘अशा परिस्थितीत भारताने दलाई लामा यांना अरुणाचल प्रदेशात जाण्यास परवानगी देण्याने सीमेवरील तणाव वाढू शकतो. तसेच, भारत-चीनमधील संबंधांवरही त्याचा विपरित परिणाम शक्‍य आहे,‘ असे कॅंग म्हणाले.

Web Title: China warns India over Dalai Lama's Arunachal Pradesh visit