
Taiwan : नॅन्सी पेलोसी तैवानमध्ये गेल्यास...; चीनचा अमेरिकेला इशारा
Pelosi Visit To Taiwan : अमेरिकन संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी तैवानमध्ये गेल्यास अमेरिकेला त्याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा चीनने अमेरिकेला दिला आहे. तत्पूर्वी नॅन्सी पेलोसी यांची तैवान दौरा रोखण्यासाठी चीनच्या शक्तीप्रदर्शन केल्याचे समोर आल्याचे वृत्त होते. त्यानंतर आता चीनकडून अमेरिकेला उघडपणे इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा: सत्कार समारंभाऐवजी कारभार चालवा; शिंदेंच्या भूमिकेवर अजित पवारांचे टीकास्त्र
गेल्या 25 वर्षात अमेरिकेत निवडून आलेल्या एकाही उच्चपदस्थ अधिकाऱ्याने तैवानला भेट दिलेली नसून, तैवानवर चीन दावा करत आलेला आहे. त्यात जर, नॅन्सी पेलोसी तैवानमध्ये गेल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा चीनने दिला आहे. नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीमुळे चिनी प्रभावावर परिणाम होऊ शकतो, अशी भीती चीनला वाटतं असून, अमेरिका तैवानमध्ये फुटीरतावादी अजेंड्यावर काम करत असल्याचा चीनचा विश्वास असून, नॅन्सी पेलोसी यांच्या भेटीमुळे याला अधिक बळ मिळेल असे चीनला वाटत आहे.
हेही वाचा: असा झाला अल जवाहिरीचा खात्मा; CIA अधिकाऱ्यांनी सांगितले सिक्रेट मिशन
पेलोसी यांचा दौरा इंडो-पॅसिफिक प्रदेशाचा
दरम्यान, या दौऱ्यावरून दोन देशांमध्ये वाद सुरु असताना पेलोसी यांचा आशिया दौरा सुरू झाल्याचे बीबीसीने म्हटले आहे. मात्र, यामध्ये तैवानचा उल्लेख करण्यात आलेला नाही. तर दुसरीकडे पेलोसी यांच्या कार्यालयाने त्यांचा दौरा इंडो-पॅसिफिक प्रदेशाचा असल्याचे सांगत यात सिंगापूर, मलेशिया, दक्षिण कोरिया आणि जपान आदी देशांचा समावेश असल्याचे म्हटले आहे.
Web Title: China Warns Us Will Pay The Price If House Speaker Nancy Pelosi Visit Taiwan
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..