चीनच्या माजी नेत्याला जन्मठेप 

वृत्तसंस्था
बुधवार, 9 मे 2018

चीनमधील कम्युनिस्ट पक्षाचे माजी वरिष्ठ अधिकारी सून झेंगकाई यांना अडीच कोटी डॉलरची लाच घेतल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा आज सुनावण्यात आली.
 

बीजिंग : चीनमधील कम्युनिस्ट पक्षाचे माजी वरिष्ठ अधिकारी सून झेंगकाई यांना अडीच कोटी डॉलरची लाच घेतल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा आज सुनावण्यात आली.

चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याविरोधात बंडाची योजना आखल्याचा झेंगकाई यांच्यावर आरोप होता. एकेकाळी झेंगकाई यांचे पक्षात मोठे वजन होते. मात्र, गेल्या वर्षी ऑक्‍टोबरमध्ये त्यांची अचानक हकालपट्टी करण्यात आली होती. आज न्यायालयाने निकाल देताना झेंगकाई यांचे सर्व राजकीय हक्क काढून घेतले आणि सर्व वैयक्तिक संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: China's former leader life imprisonment