चीनची तियानवेन -१ या अवकाशयानाची बग्गी उतरली मंगळावर

चीनचे तियानवेन -१ या अवकाशयानाची बग्गी शनिवारी मंगळाच्या पृष्ठभागावर सुखरूप उतरली.
Tianwen-1
Tianwen-1Sakal

बीजिंग - चीनचे (China) तियानवेन -१ (Tianwen-1) या अवकाशयानाची बग्गी (Spacecraft) शनिवारी मंगळाच्या (Mars) पृष्ठभागावर सुखरूप उतरली. अमेरिकेनंतर मंगळाच्या जमिनीवर यान उतरविणारा चीन हा जगातील दुसरा देश ठरला आहे. यासंबंधी चायना नॅशनल स्पेस ॲडमिनीस्ट्रेशनच्या वतीने अधिकृत घोषणा करण्यात आली. (Chinas Tianwen 1 spacecraft landed on Mars)

चीनच्या पुराणकथेतील अग्नीची देवता ‘झुरॉन्ग’ च्या नावाने या बग्गीचे (रोव्हर) नामकरण करण्यात आले आहे. मंगळावरील युटोपिया इम्पॅक्ट बेसिनमधील एका सपाट मैदानावर हा २४० किलो वजनाची बग्गी उतरली आहे. सहा चाकांचा ही बग्गी पुढील तीन महिने मंगळाच्या पृष्ठभागाचा अभ्यास करणार आहे. तियानवेन-१ हे अवकाशयान ऑर्बायटर लॅंडर आणि बग्गीसहीत २३ जुलै २०२० मध्ये प्रक्षेपित करण्यात आले होते. मंगळावर उतरल्यानंतर तियानवेन -१ यानाच्या झुरॉन्ग बग्गीने पृथ्वीवर टेलिमेट्री सिग्नल पाठवला. यातून युटोपिया प्लेटवर लॅंडर सुखरूप उतरल्याचे सिद्ध झाले. अमेरिकेनंतर अशी मोहीम यशस्वी करणाऱ्या चीनने एक आव्हानात्मक मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाच्या (सीपीसी) केंद्रीय समितीने तियानवेन-१ मोहिमेतील शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले.

Tianwen-1
इस्रायलचा मीडिया कार्यालयांवर AIR STRIKE

अशी झाली लॅंडिंग

  • सात महिन्यांच्या प्रवासानंतर १० फेब्रुवारीला तियानवेन-१ हे यान मंगळाच्या कक्षेत

  • मंगळाभोवती फिरून तेथील माहिती अवकाशयानाने पृथ्वीकडे पाठवली

  • शनिवारी सकाळी ऑर्बायटरपासून लॅंडर आणि बग्गी विलग

  • तीन तासांच्या उड्डाणानंतर लॅंडर आणि बग्गीने मंगळाच्या वातावरणात प्रवेश

  • मंगळाच्या पृष्ठभागापासून १०० मिटर उंचीवर आल्यानंतर लॅंडरने पृष्ठभागाची पाहणी केली

  • त्यानंतर लॅंडर सुरक्षितपणे मंगळाच्या जमिनीवर उतरले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com