चीनवर धुळीच्या वादळाचे संकट; जनजीवन विस्कळित, फ्लाईट्स रद्द

china
china

बिजिंग- चीनच्या राजधानीत आणि उत्तरकडील अनेक भागात दशकातील सर्वाधिक वाईट धुळीचे वादळ आले आहे. त्यामुळे देशातील अनेक विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात आलेल्या धुळीच्या वादळामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. अनेक दैंनदिन व्यवहार थांबवण्यात आले आहेत. शिवाय धुळ आणि वाळूच्या वादळामुळे जवळपास 400 फ्लाईट्स रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आलीय. अशा प्रकारची वादळे या काळात नेहमी येत असतात. पण, आताचे वादळ दशकातील सर्वात वाईट असल्याचं सांगण्यात येत आहे. या काळात धुळीचे वादळ पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहू लागते. या वादळामुळे जपानचा उत्तर भागही प्रभावित होत असतो. 

चीनमध्ये अशा वादळांविरोधात लढण्यासाठी पूर्वीपासून तयारी केली जातेय. देशात मोठ्या प्रमाणात झाडे लावण्यात आले आहेत. तसेच अन्य उपायही करण्यात आले आहे. यामुळे वादळाची तीव्रता कमी होते. पण, वाढतं शहरीकरण आणि उद्योगधंद्यामुळे पर्यावरणावर मोठा ताण पडत आहे. The National Meteorological Center नुसार, धुळीचे वादळ 12 प्रांतांना प्रभावित करेल. हे धुळीचे वादळ गेल्या दशकातील सर्वात वाईट असून त्याने देशाचा अधिकसा भाग व्यापला आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com