नेपाळमधील विरोधामुळे चीनचा संताप! खोट्या बातम्यांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

नेपाळमध्ये काही दिवसांपासून चीनच्या विरोधात आंदोलने होत आहेत.
china
chinaesakal

नवी दिल्ली : नेपाळमध्ये काही दिवसांपासून चीनच्या आंदोलने होत आहेत. काठमांडूत चिनी दुतावासाचे प्रवक्ता वांग शियाओलिंगने नेपाळमध्ये चीनच्या उपस्थितीच्या विरोधात नुकतेच झालेल्या निदर्शनांमुळे प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. त्यात म्हटले आहे, की चीन नेपाळला बेल्ट अँड रोड इनिशिटिव्हचा एक महत्त्वाचा भागीदार मानतो. नेपाळच्या मदतीसाठी कोणतेही राजकीय अटी ठेवत नाही. प्रवक्ता म्हणाला, की चीन (China) आणि नेपाळ (Nepal) पारंपरिक शेजारी देश आहेत. चीन शांततापूर्ण सहअस्तित्वाच्या पाच सिद्धांताचे पालन करित आहे. चीन नेपाळची सार्वभौमत्व आणि अखंडतेचा सन्मान करतो. एकमेकांचे अंतर्गत गोष्टीत ढवळाढवळ न करता द्विपक्षीय मैत्रीपूर्ण संबंध वाढवत आहे. नेपाळमध्ये चीनच्या वाढत्या प्रभावामुळे निदर्शने झाली आहेत. (Chinese Embassy Issues Statement Against China In Nepal)

china
आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेसाठी भारताचा मदतीचा हात, देणार ६६७० कोटी

निदर्शनकर्त्यांनी चिनी हस्तक्षेप बंद करा, सीमेवरील अतिक्रमण बंद करा आणि चीनमध्ये शिकत असलेल्या नेपाळी विद्यार्थ्यांसाठी सुरक्षेच्या उपाययोजना करा या घोषणा देत चीनचा विरोध केला आहे. चीनने म्हटले आहे, की दोन्ही देशांनी १९६० दशकाच्या सुरुवातीला मैत्रीपूर्ण वाटाघाटीतून सीमावाद मिटवला आहे. आता काही वाद नाही. दोन्ही देश परराष्ट्र अधिकारी सीमेसंबंधित संवाद ठेवतात. आम्हाला आशा आहे की नेपाळमधील नागरिक खोट्या बातम्यांनी विचलित होणार नाहीत. मोठ्या शिताफीने नेपाळसाठी एक तरफा माल वाहतूक सुरु केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com