चीनच्या पायलटने मुद्दाम विमान पाडलं? 134 जणांच्या मृत्यूचं रहस्य उलगडलं

china plane crash
china plane crash

मार्चमध्ये चीनच्या दक्षिणेकडील ग्वांग्शी प्रांतात क्रॅश झालेल्या चायना इस्टर्न एअरलाइन्सच्या विमानाबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे विमान थेट जमिनीच्या दिशेने कोसळत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर तर्कवितर्कांना उधाण आलं होतं. मात्र, चौकशी समितीने दिलेल्या अहवालानुसार मोठा खुलासा झालाय. (Boeing 737 Crash)

वैमानिकांनी हे विमान जाणूनबुजून क्रॅश केल्याचं दिसतं. अपघातानंतर विमानाचा ब्लॅक बॉक्स हस्तगत करण्यात आला. त्यातून मिळालेल्या डेटानुसार कॉकपिटमधील कोणीतरी जाणूनबुजून विमान क्रॅश केल्याचं स्पष्ट झालंय. Flight Radar24 कडून मिळालेल्या माहितीनुसार 132 प्रवासी घेऊन जाणारे बोईंग 737 29,000 पॉईँटवरून सुमारे 700 mph वेगाने उड्डाण करत होतं. याच वेळी अपघात झाला. या दुर्घटनेत सर्वांचा मृत्यू झाला. चीनच्या 28 वर्षांतील ही सर्वात मोठी विमानाची दुर्घटना होती.

विमानाच्या भग्न अवशेषांमध्ये सापडलेल्या ब्लॅक बॉक्स फ्लाइट रेकॉर्डरच्या डेटाचे विश्लेषण करणाऱ्या यूएस अधिकाऱ्यांनी हा खुलासा केला आहे. कॉकपिटमधून जाणूनबुजून मिळालेल्या इनपुटमुळे बोईंग 737 दुर्घटनाग्रस्त झालं. अधिका-यांनी सांगितलं की, वैमानिकांनी वेगाने विमान उतरवण्यात सुरुवात केली. यावेळी हवाई वाहतूक नियंत्रक आणि जवळच्या विमानांचे त्यांना कॉल येत होते. मात्र, त्याला प्रतिसाद दिला नाही, असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.

अमेरिकेच्या नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डाच्या चेअरपर्सन जेनिफर होमेंडी यांनीही अधिकत माहिती दिली. बोईंगच्या तपासात मदत करण्यासाठी त्या चीनला गेल्या होत्या. यावेळी त्यांना विमानासंबंधी कोणत्याही सुरक्षिततेच्या समस्या आढळल्या नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com