चीनची पाणबुडी कराचीच्या किनाऱ्यावर

वृत्तसंस्था
शनिवार, 7 जानेवारी 2017

भारतीय नौदलाने याबाबत अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. अरबी समुद्रात पाणबुडी तैनात करण्यामागे भारताच्या या क्षेत्रातील प्रभावाला आव्हान देण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जाते. गेल्या महिन्यात नौदलप्रमुख ऍडमिरल सुनील लांबा यांनीही चीनच्या पाणबुड्या आणि इतर युद्धनौकांवर बारीक लक्ष असल्याचे म्हटले होते

नवी दिल्ली - चीनची अण्वस्त्रवाहू पाणबुडी गेल्या वर्षी मे महिन्यात कराची बंदरावर आली होती, हे गुगल अर्थवरून मिळालेल्या छायाचित्रांवरून स्पष्ट झाले आहे. भारताच्या युद्धनौकांवर लक्ष ठेवून त्यांची माहिती मिळविणे, हा त्यामागील हेतू असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

उपग्रहाकडून मिळणाऱ्या छायाचित्रांमधील एका तज्ज्ञाला चीनच्या नौदलाची ही पाणबुडी कराचीच्या किनाऱ्यावर असल्याचे दिसली. ही पाणबुडी अत्याधुनिक असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. भारतीय नौदलाने याबाबत अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. अरबी समुद्रात पाणबुडी तैनात करण्यामागे भारताच्या या क्षेत्रातील प्रभावाला आव्हान देण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जाते. गेल्या महिन्यात नौदलप्रमुख ऍडमिरल सुनील लांबा यांनीही चीनच्या पाणबुड्या आणि इतर युद्धनौकांवर बारीक लक्ष असल्याचे म्हटले होते.

अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुड्यांमध्ये वारंवार इंधन भरण्याची गरज नसल्याने त्यांचा पल्ला प्रचंड असतो. त्यामुळे अशा पाणबुड्यांवर क्षेपणास्त्रे सज्ज करून त्या पाण्याखाली बऱ्याच मोठ्या कालावधीसाठी तैनात ठेवल्या जाऊ शकतात. त्यांचा माग काढणेही अवघड असते.

Web Title: Chinese submarine near Karachi