"पाकिस्तान दिना'मध्ये तुर्कस्तान,चीनचा सहभाग

वृत्तसंस्था
सोमवार, 13 मार्च 2017

23 मार्च 1940 रोजी लाहोर येथील अधिवेशनामध्ये स्वतंत्र पाकिस्तानचा स्पष्ट ठराव मांडण्यात आला होता. हा दिवस पाकिस्तान दिन म्हणून साजरा करण्यात येतो

इस्लामाबाद - पाकिस्तानची राजधानी असलेल्या इस्लामाबाद शहरामध्ये पुढील आठवड्यामध्ये होणाऱ्या "पाकिस्तान दिना'साठीच्या संचलनामध्ये प्रथमच चीन व तुर्कस्तान या देशांचे सैन्यदलही सहभागी होणार आहे.

चीन व तुर्कस्तान या मित्रदेशांचे सैन्यदल या वर्षीच्या संचलनामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती पाकिस्तानी सैन्याचे प्रवक्ते मेजर जनरल असीफ गफूर यांनी दिली. 23 मार्च 1940 रोजी लाहोर येथील अधिवेशनामध्ये स्वतंत्र पाकिस्तानचा स्पष्ट ठराव मांडण्यात आला होता. हा दिवस पाकिस्तान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी पाकिस्तानच्या सैन्यदलातर्फे संचलन करण्यात येते. मात्र गेली काही वर्षे सैन्याच्या उठावाच्या भीतीमुळे हे संचलन रद्द करण्यात आले होते. परंतु 2015 पासून पुन्हा एकदा हा दिवस साजरा करण्यात येऊ लागला आहे.

पाकिस्तान दिनानिमित्त पाकच्या सैन्यदलासमवेत चीन व तुर्कस्तान या देशांचे सैन्यदलही संचलन करण्याची ही घटना सूचक मानण्यात येत आहे.

Web Title: Chinese, Turkish troops to take part in ‘Pakistan Day’ parade