तू जाड आहेस, आईस्क्रीम नको ना खाऊ..

Chinese Woman Fat Shamed By Boyfriend For Wanting Ice Cream
Chinese Woman Fat Shamed By Boyfriend For Wanting Ice Cream

बीजींग (चीन): प्रियकर आणि प्रेयसी डेटवर गेले होते. जेवण झाल्यानंतर प्रेयसीने प्रियकराकडे आईस्क्रीमची मागणी केली. प्रियकराने तू जाड असल्याचे सांगत आईस्क्रीम न खाण्याचा सल्ला दिला. मात्र, चिडलेल्या प्रेयसीने कात्रीने भोसकून प्रियकराचा खून केला.

प्रेयसीने कात्रीने भोसकून प्रियकराचा खून केल्याची घटना हिनान प्रांतात बुधवारी (ता. 14) घडली. हॉटेलमध्ये अचानक घडलेल्या या प्रकारामुळे गोंधळ उडाला होता. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, 'प्रियकर आणि प्रेयसी डेटवर गेले होते. हॉटेलमध्ये जेवणानंतर प्रेयसीने आणखीन एक आईस्क्रीम खाण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, प्रियकराने तिला जाड असल्याची जाणीव करून दिली. गंमतीने केलेले हे वक्तव्य प्रेयसीला त्रासदायक ठरले. तिने समोर असलेली कात्री प्रियकराच्या शरीरामध्ये अनेकदा भोसकली. यावेळी हॉटेलमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला. या घटनेबाबतची माहिती पोलिसांना समजल्यानंतर काही वेळातच पोलिस व डॉक्टरांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी युवक रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. डॉक्टरांनी त्याच्यावर प्रथमोपचार केले. शिवाय, तातडीने त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र,  रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.'

दरम्यान, प्रेयसीला आपल्या हातून घडलेली घटना लक्षात आल्यानंतर तिने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तिला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com