अमेरिकेचा रॉक गायक ख्रिस कॉर्नेलचे निधन

वृत्तसंस्था
शुक्रवार, 19 मे 2017

ख्रिसचा मृत्यू अत्यंत अनपेक्षित असून त्याची पत्नी व कुटुंबाला मोठा धक्का बसल्याचे त्याचा प्रतिनिधी ब्रेन बम्बेरी याने सांगितले. कॉर्नवेलच्या मृत्यूचे कारण समजण्यासाठी त्याच्या मृतदेहाची वैद्यकीय तपासणी करण्याचा निर्णय कुटुंबाने घेतला आहे

वॉशिंग्टन - "रॉक' गायक व "साउंडगार्डन' आणि "ऑडिओस्लाव्ह' या बॅंडमधील आघाडीचा गायक म्हणूस प्रसिद्धीस आलेला ख्रिस कॉर्नेल (वय 52) याचे निधन झाल्याचे त्याच्या निकटवर्तीयांनी गुरुवारी जाहीर केले. कॉर्नेल हा दौऱ्यावर असताना डेट्रॉईट येथे बुधवारी (ता.17) रात्री त्याचे निधन झाले.

ख्रिसचा मृत्यू अत्यंत अनपेक्षित असून त्याची पत्नी व कुटुंबाला मोठा धक्का बसल्याचे त्याचा प्रतिनिधी ब्रेन बम्बेरी याने सांगितले. कॉर्नवेलच्या मृत्यूचे कारण समजण्यासाठी त्याच्या मृतदेहाची वैद्यकीय तपासणी करण्याचा निर्णय कुटुंबाने घेतला आहे. संगीत क्षेत्रातील प्रतिष्ठेचा ग्रॅमी पुरस्कार त्याला मिळाला होता. नव्वदच्या दशकात लोकप्रिय झालेल्या रॉक संगीताचा तो एक शिल्पकार होता. सिएटलमध्ये त्याने "साउंडगार्डन बॅंड' स्थापन केला होता. संगीतकार, वादक म्हणूनही त्याची ओळख होती.

Web Title: Chris Cornell is no more