'क्‍लिंटन यांच्या धोरणामुळे तिसरे महायुद्ध होईल'

वृत्तसंस्था
बुधवार, 26 ऑक्टोबर 2016

वॉशिंग्टन : डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्‍लिंटन यांच्या सिरीयासंदर्भातील परराष्ट्र धोरणामुळे तिसरे महायुद्ध होईल, असे खळबळजनक वक्तव्य रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे.

वॉशिंग्टन : डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्‍लिंटन यांच्या सिरीयासंदर्भातील परराष्ट्र धोरणामुळे तिसरे महायुद्ध होईल, असे खळबळजनक वक्तव्य रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे.

अमेरिकेत निवडणूकीचे आणि निवडणूक प्रचाराचे वारे वेगाने वाहत आहे. वेगवेगळ्या प्रचारसभांमध्ये ट्रम्प खळबळजनक वक्तव्ये करत आहेत. आता नव्याने त्यांनी क्‍लिंटन यांच्यावर निशाणा साधताना सिरीया संदर्भातील क्‍लिंटन यांच्या परराष्ट्र धोरणामुळे तिसऱ्या महायुद्धाची परिस्थिती निर्माण होईल, असे म्हटले आहे. तसेच "जर तुम्ही सिरीयाविरुद्ध युद्ध पुकरायचे म्हटलात तर ते केवळ सिरीयासोबतचे युद्ध नसून तुम्ही सिरीया, रशिया आणि इराण सोबतचे युद्ध असेल. ते योग्य होईल का?', असा प्रश्‍नही ट्रम्प यांनी उपस्थित केला. शिवाय रशिया ही आण्विक देश असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. या पार्श्‍वभूमीवर टीकेला उत्तर देताना क्‍लिंटन यांनी डेमोक्रॅटिक पक्षासह रिपब्लिकन पक्षाच्या सुरक्षा तज्ज्ञांना ट्रम्प यांचे नेतृत्त्व अमान्य केल्याची टीका केली आहे.

Web Title: Clinton's foreign policy plan would start WWIII