Rishi Sunak : CM शिंदेंनी नव्या पंतप्रधानांना दिल्या मराठमोळ्या शुभेच्छा; म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rishi Sunak Eknath Shinde
Rishi Sunak : CM शिंदेंनी नव्या पंतप्रधानांना दिल्या मराठमोळ्या शुभेच्छा; म्हणाले...

Rishi Sunak : CM शिंदेंनी नव्या पंतप्रधानांना दिल्या मराठमोळ्या शुभेच्छा; म्हणाले...

भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान झाले आणि त्यानंतर देशभरात त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. भारताशी त्यांचे विशेष संबंध आहेत. त्यांना महाराष्ट्रातूनही अनेक नेत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांचं अभिनंदन केलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठीतून ट्वीट करत ऋषी सुनक यांना पुढील कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या ट्वीटमध्ये एकनाथ शिंदे म्हणतात, "भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांची ब्रिटनच्या पंतप्रधान पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन तसेच भावी राजकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा." पुढे एकनाथ शिंदे यांनी आणखी एक ट्वीट केलं आहे.

त्यांचं दुसरं ट्वीट इंग्रजीतून आहेत. या ट्वीटमध्ये एकनाथ शिंदे म्हणतात, "युनायटेड किंगडमच्या सर्वात तरुण आणि भारतीय वंशाच्या पहिल्या पंतप्रधानांपैकी एक म्हणून नियुक्त झाल्याबद्दल ऋषी सुनक यांचे अभिनंदन. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर, आपण सर्व भारतीयांना अभिमानाचा क्षण दिला आहे. ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून तुम्हाला यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा."

हेही वाचा: British PM : ऋषी सुनक पंतप्रधान होताच मिलिंद नार्वेकरांचा सुधा मूर्तींना फोन

यापूर्वी उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर यांनी ऋषी सुनक पंतप्रधान होताच सुधा मूर्ती यांना फोन करत शुभेच्छा दिल्या होत्या. ऋषी सुनक हे इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांचे जावई आहेत.

टॅग्स :Eknath Shinde