स्थलांतरितांविरुद्ध अमेरिकनांच्या उलट्या बोंबा!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

अ डे विदाऊट इमिग्रंट्स' असे एक देशव्यापी आंदोलन स्थलांतिरतांनी गुरुवारी छेडले होते. हजारो स्थलांतरित लोक सरकारच्या धोरणाच्या निषेधार्थ कामावर गेले नाहीत. त्या पार्श्वभूमीवर व्हेरोनिका यांनी ही जाहीर टीका केली.  

नेपल्स- अमेरिकेत अल्पसंख्यांक असणाऱ्या स्थलांतरित लोकांच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या संस्थांमध्ये नोकरी करून उपजीविका करणारे अमेरिकन नागरिकही स्थलांतरितांवरच टीकेची झोड उठवत असल्याचा प्रकार आता समोर येत आहे. 
एका शैक्षणिक संस्थेत नोकरी करणाऱ्या अमेरिकन शिक्षिकेने स्थलांतरितांवर कुत्सितपणे जाहीर टीका केल्याने तिच्यावर बदलीची कारवाई करण्यात आली आहे. 

'कॉलिअर काऊंटीमधील पार्कसाइड या प्राथमिक शाळेच्या शिक्षिका व्हेरोनिका कोचिस फ्लेमिंग यांनी फेसबुकवर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, "घरी थांबणाऱ्या स्थलांतरित लोकांबद्दल एक गंमतीदार गोष्ट म्हणजे आपण उर्वरित लोक त्यांचे खर्चे उचलतो आणि आपण नेहमी काम करीत राहतो."

नंतर ही पोस्ट काढून टाकण्यात आली. विरोधाभास म्हणजे व्हेरोनिका ज्या शाळेत शिकवतात तिथेच 96 टक्के लोक अल्पसंख्यांक लोक काम करतात. त्यांच्या कष्टावरच ही संस्था चालते. त्यामध्ये 70 टक्के लॅटिनो, तर 20 टक्के हैती कर्मचारी आहेत. 

अ डे विदाऊट इमिग्रंट्स' असे एक देशव्यापी आंदोलन स्थलांतिरतांनी गुरुवारी छेडले होते. हजारो स्थलांतरित लोक सरकारच्या धोरणाच्या निषेधार्थ कामावर गेले नाहीत. त्या पार्श्वभूमीवर व्हेरोनिका यांनी ही जाहीर टीका केली.  
फेसबुक पोस्टमध्ये त्या पुढे म्हणतात, "आज खाणाऱ्यांची कमी तोंडं दिसत आहेत. शक्य आहे तोपर्यंत तुम्ही मजा करून घ्या. मोठ्या प्रमाणावर लोक सोडून जात आहेत याचा मला आनंद होतोय. लेट अस मेक अमेरिका ग्रेट अगेन. थँक्स डोनाल्ड ट्रम्प!!"

स्थलांतरित महिला जुआना पेरेझ म्हणाल्या, "मला दुःख झालं. माझ्या भावना दुखावल्या गेल्यात. 
एखादी शिक्षिका अशी कशी बोलू शकते? माझा तर विश्वासच बसत नाही," असे त्यांनी सांगितले. 
आपल्या मुलांना उज्ज्वल भवितव्य आणि अधिक चांगले शिक्षण देण्यासाठी त्या येथे आल्या आहेत. त्यांची मुले पार्कसाइड एलेमेंटरी स्कूलमध्ये शिकतात. "शिक्षिकेने मुलांना शिकविणे अपेक्षित असते. त्यांना दुखवायचे नसते." अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Collier teacher reassigned after anti-immigrant Facebook post