Coronavirus : कोरोनाने केली पत्रकारांचीही कोंडी

Reporter
Reporter

ब्रुसेल्स - ‘कोरोनाव्हायरसच्‍या संकटात कामावरुन कमी करणे आणि माध्यम स्वातंत्र्यावर हल्ले या भीतीमुळे जगभरातील वृत्तपत्रकारांची स्थिती खालावत आहे’, असे मत ब्रुसेल्स येथील ‘इंटरनॅशन फेडरेशन ऑफ जर्नालिस्ट’ (आयएफजे)ने प्रसिद्ध केलेल्या सर्वेक्षणात व्यक्त केले आहे.

कोरोनासंबंधी वार्तांकनाच्या वेळी निर्बंध, अडथळे किंवा धमक्यांना सामोरे जावे लागते, असे चारपैकी तीन पत्रकारांनी म्हटल्याची नोंद या संघटनेने केली आहे. या सर्वेक्षणासाठी ७७ देशांमधील एक हजार ३०८ पत्रकारांकडून अनुभव मागविण्यात आले होते. त्याचे विश्‍लेषण करताना वेतन कपात, उत्पन्नात घट आणि कामावरुन कमी करणे या दडपणाबरोबरच सध्याचा काळ हा कामाच्या दृष्टिने अत्यंत वाईट आहे, असे मत दोन तृतीयांश श्रमिक पत्रकार व स्वंतत्र पत्रकारांनी नोंदविले.

उत्पन्नात घट
बातम्या मिळविणे आणि गुणवत्तापूर्वक पत्रकारिता करणे अवघड होत असतानाच ढासळणारे माध्यम स्वातंत्र्य अन कपातीचे धोरण यामुळे पत्रकारितेत चिंतेचे वातावरण असल्याचे या पाहणीतून दिसून आले, अशी माहिती ‘आयएफजे’चे सरचिटणीस ॲन्थोनी बेलांगर यांनी दिली. पत्रकारिता ही जनहितासाठी असते. तिला जनतेचा पाठिंबा असतो अन राजकीय अडथळे व हस्तक्षेप मोडून काढणे हे तिचे काम असते, असे ते म्हणाले. या महिन्‍यात केलेल्या या सर्वेक्षणात स्वंतत्र काम करणाऱ्या जवळजवळ सर्व पत्रकारांनी उत्पन्न कमी झाल्याचे किंवा कामाची संधी दुरावल्याचे सांगितले आहे.

ताण व चिंता
कोरोनोव्हायरसच्या या जीवघेण्या साथीत पत्रकारिता करताना पत्रकारांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाल्याचे आढळले आहे. पाहणीतील निम्म्या पत्रकारांना तणाव व चिंता जाणवत होती.

माध्यम स्वातंत्र्याला धोका
ग्रीस ते इंडोनेशिया आणि चाड ते पेरू या देशांमधील पत्रकारांनी या पाहणीत भाग घेतला. माध्यम स्वातंत्र्याच्या स्थितीचा उल्लेख करताना बहुतेकांनी ‘धोकादायक’, ‘अडचणीची’, ‘भयानक’, ‘अत्यंत वाईट’, ‘खालावलेली’ आणि ‘मर्यादित’ अशा शब्दांत वर्णन केले. 

सर्वेक्षणातील नोंदी
    घरी बसून काम करताना पुरेशा व कार्यक्षम यंत्रसामुग्रीची कमतरता
    बाहेर जाऊन काम करताना सुरक्षिततेच्या उपकरणांचा अभाव
    माध्यम स्वातंत्र्याची गळपेची
    साथ आल्यापासून डझनभर पत्रकारांना अटक किंवा खटले दाखल
    सरकार व अधिकृस स्त्रोतांकजून माहिती मिळविणे जिकरीचे
    पत्रकार परिषदांमध्ये प्रश्‍न विचारण्यावर बंधने
    येण्या-जाण्‍यावर निर्बंध

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com