Pfizer लशीमुळे अनेकांना होतेय एलर्जी; डॉक्टरांनी व्यक्त केली चिंता

vaccination
vaccination

न्यूयॉर्क : जगातील काही देशांमध्ये कोरोनाचे लशीकरण सुरु झालेले आहे. मात्र, लशीकरणानंतर आलेल्या सुरवातीच्या रिपोर्ट्सनंतर डॉक्टर्स आणि संशोधकांची चिंता वाढलेली दिसून आली आहे. कारण अमेरिका आणि ब्रिटनमधून अशी माहिती मिळत आहे की, फायझरच्या लशीमुळे अनेक लोकांना एलर्जी झाल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. सध्या अमेरिकेत आपत्कालीन वापरासाठी फायझरच्या लशीला मान्यता देण्यात येऊन लशीकरणास सुरवात झाली आहे. तर ब्रिटनमध्ये फायझर आणि ऑक्सफर्डची एस्ट्राझेनेकाची लस लोकांना दिली जात आहे.

सीएनएनने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे चीफ सायंटिस्ट एडव्हायझर डॉ. मॉनसेफ स्लेवॉई यांनी म्हटलंय की, दुसऱ्या लशीच्या तुलनेत फायझरच्या लशीमुळे अनेक लोकांना एलर्जी होत आहे. बहुतकरुन इपीपेन नावाचे औषध वापरणाऱ्या लोकांना ही एलर्जी झाल्याचं दिसून येतंय. हे औषध अशा लोकांना दिलं जातं जे जास्तकरुन एलर्जीमुळे त्रासलेले असतात. याआधी ब्रिटनमध्येही दोन जणांनी फायझर लस घेतल्यानंतर एलर्जीचा जास्त त्रास झाल्याची तक्रार केली होती.

न्यूयॉर्क शहरात आतापर्यंत 30 हजार लोकांना लशीचा खुराक देण्यात आला आहे. आतापर्यंत काहीच लोकांनी एलर्जीची तक्रार केलीय, ही दिलासादायक बाब आहे. कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे संपूर्ण जगात अमेरिका हवालदिल झाला आहे. फायझर लशीची आणखी एक अडचण अशी आहे की, या लशीला -70 डिग्री सेल्सियसमध्येच स्टोअर करुन ठेवावं लागतं. तर मॉडर्नाच्या लशीसाठी -20 डिग्री सेल्सियस तापमानाची गरज असते. मागच्या आठवड्यात फायझरने याप्रकरणी स्पष्टीकरण दिलं आहे. कंपनीने म्हटलंय की, लशीच्या चाचणी दरम्यान अशा कोणत्याही व्यक्तीला समाविष्ट केलं गेलं नव्हतं ज्यांना लशीची एलर्जी होईल. लशीमुळे सर्वांनाच एलर्जी होईल, असं काही नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com