कोणत्या देशात आहे वेगवेगळ्या कंपन्यांचे डोस मिक्स करण्याची परवानगी?

कोणत्या देशात आहे वेगवेगळ्या कंपन्यांचे डोस मिक्स करण्याची परवानगी?

नवी दिल्ली : जगभरात सध्या लसीकरणाच्या कार्यक्रमादरम्यान लसीची परिणामकारकता तपासण्याबाबतचे संशोधन सुरु आहे. याशिवाय लसीचा प्रभाव वाढवण्यासाठी अनेक शोध देखील सुरु आहेत. यासंदर्भातच दोन वेगवेगळ्या कंपनीचे डोस एकत्र करुन दिल्यास काय परिणाम होईल, याप्रकारे कॉकटेल लसीकरण खरंच उपयुक्त ठरेल याबाबत सध्या शोध घेतला जातोय. लसीच्या पुरवठ्यास होणारा विलंब आणि त्यामुळे लसीकरण मोहिमेत येणारा धीमेपणा यामुळे सुरक्षाविषयक समस्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने अनेक देश दुसर्‍या डोससाठी वेगवेगळ्या कोविड लसींच्या पर्यायांचा वापर करण्याचा विचार करत आहेत. याप्रकारे कोरोनाची लस मिक्स केल्याने त्याच्या कार्यक्षमतेवर काय परिणाम होतो, हे तपासण्यासाठी सध्या अनेक वैद्यकीय अभ्यास चालू आहेत. (corona crisis countries Which are allowing you to mix Covid 19 vaccines)

कोणत्या देशात आहे वेगवेगळ्या कंपन्यांचे डोस मिक्स करण्याची परवानगी?
प्रियांका गांधींनी PM मोदींना करुन दिली 15 ऑगस्टच्या घोषणेची आठवण

असे काही देश आहेत जे या निर्णयाचा विचार करत आहेत किंवा अशा प्रकारचा उपाय अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे.

कॅनडा : कॅनडा एस्ट्राझेनेकाच्या पहिल्या डोसनंतर फायझर अथवा मॉडर्नाची लस वापरण्याची शिफारस केली असल्याची माहिती CBC न्यूजने दिली आहे. मॉडर्ना किंवा फायझरचा पहिला डोस प्राप्त करणार्‍यांना यापैकी एका लसीचा दुसरा डोस प्राप्त होईल.

चीन : चीनचे संशोधक देखील एप्रिल महिन्यामध्ये कोरोनाच्या दोन लसींच्या एकत्रिकणा संदर्भात विचार करत होते. CanSino Biologics आणि Chongqing Zhifei Biological Products यांनी तयार केलेल्या या दोन लसींच्या एकत्रित वापराचा हा विचार होता.

फिनलँड : फिनलँड इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ एँड वेलफेअरने म्हटलंय की, एस्ट्राझेनेका लसीचा पहिला डोस मिळालेल्या आणि वय वर्षे 65 पेक्षा कमी वयाच्या लोकांना दुसरा डोस वेगळ्या लसीचा मिळू शकतो.

फ्रान्स : फ्रान्सच्या सर्वोच्च आरोग्य सल्लागार मंडळाने एप्रिलमध्ये अशी शिफारस केली होती की, 55 वर्षांखालील लोकांना प्रथम अ‍एस्ट्राझेनेकाची लस दिली गेली असेल तर मेसेंजर आरएनए लसीसह दुसरा डोस घ्यावा. मात्र अद्याप याप्रकारे डोस मिसळण्याचे परीक्षण चाचण्यांमध्ये केले गेले नाहीये.

नॉर्वे : नॉर्वेने 23 एप्रिल रोजी सांगितलंय की, ज्यांना एस्ट्राझेनेका लसीचा डोस मिळाला आहे त्यांना mRNA लसीचा दुसरा डोस देता येऊ शकतो.

रशिया : रशियामध्ये अ‍ॅस्ट्रॅजेनेका आणि स्पुटनिक व्ही या लसींचे मिश्रणाच्या चाचण्यांचा अभ्यास सुरु आहे. आरोग्य मंत्रालयाच्या नैतिक समितीने यासंदर्भात अधिक डेटाची विनंती केली आहे. अद्याप याला देशात मान्यता दिलेली नाहीये.

याशिवाय साउथ कोरिया, स्पेन, स्विडन, ब्रिटन आणि अमेरिकेत सध्या यासंदर्भात विचार केला जातो आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com