कोरोनाने हज यात्रेचं चित्रच बदलून टाकलं, पाहा PHOTO

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 1 August 2020

कोरोनामुळे एखाद्या मोठ्या कार्यक्रमावर किती परिणाम झाला हे हज यात्रेच्या दोन फोटोंवरून समजू शकेल. कोरोनाच्या आधी हजमध्ये सहभागी झालेले आणि आता हजला पोहोचलेल्यांचे फोटो व्हायरल होत आहेत. 2019 मध्ये जगभरातील जवळपास 25 लाख जण हज यात्रेला उपस्थित होते.

मक्का - कोरोनामुळे जगात लोकांच्या जीवनशैलीवर मोठा परिणाम झाला आहे. मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग या गोष्टी आयुष्याचा अविभाज्य भाग बनल्या आहेत. मोठ मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजनही यामुळे रद्द झाले आहे. तसंच लोकांच्या एकत्र गर्दी करण्याचं प्रमाणही कोरोनाच्या संकटामुळे कमी झालं आहे. कोरोनामुळे एखाद्या मोठ्या कार्यक्रमावर किती परिणाम झाला हे हज यात्रेच्या दोन फोटोंवरून समजू शकेल. कोरोनाच्या आधी हजमध्ये सहभागी झालेले आणि आता हजला पोहोचलेल्यांचे फोटो व्हायरल होत आहेत. कोरोनामुळे यंदा फक्त काही हजार लोक हज यात्रेला पोहोचू शकले. 

हज यात्रेचे काही फोटो व्हायरल होत आहेत. यामध्ये सोशल डिस्टन्सिंगच पालन करत सउदी अरब इथल्या मक्का इथल्या मशिदीत काबा परिक्रमा करताना लोक दिसत आहेत. कोरोना संसर्ग होण्यापासून वाचण्यासाठी लोकांनी सुरक्षित अंतरही ठेवलं होतं.

दरम्यान, याऊलट गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणावर हजसाठी लोकांनी गर्दी केली होती. मात्र यंदा लोकांनी सोशल डिस्टन्सिंगसह हजारो नागरिकांनी यात्रेला उपस्थिती लावली होती. यावेळी लोकांनी मास्क घातले होते. तसंच उन्हाचा त्रास होत असल्यानं छत्र्याही घेतल्या होत्या. 

एएफपी वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, 2019 मध्ये जगभरातील जवळपास 25 लाख जण हज यात्रेला उपस्थित होते. या तुलनेत यंदा केवळ 10 हजार लोकच येऊ शकले होते. कोरोनाच्या आधी हज यात्रेला येणाऱ्यांना काबाला स्पर्श करता येत होता. मात्र कोरोनामुळे आता ही परिस्थिती बदलली आहे. 

एका मंत्र्याने टीव्हीवर बोलताना सांगितलं की, कोरोनाचं संकट असल्यानं धार्मिक परंपरा आणि याठिकाणी येणाऱ्या लोकांची संख्या कमी करण्याची गरज आहे. यासाठी वेगवेगळ्या अधिकृत संस्थांना खूप प्रयत्न करावे लागले आहेत. बुधवारपासून हज यात्रेला सुरुवात झाली आहे. मुस्लिम धर्मातील पाच स्तंभापैकी एक हज असल्याचं मानलं जातं. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona effect on hajj 2020 see photos