अमेरिकेत कोरोनाचा हाहाकार सुरुच, एका दिवसात दीड लाखांहून अधिक रुग्ण

corona us.png
corona us.png

नवी दिल्ली- कोरोना विषाणूने अमेरिकेत गंभीर रुप धारण केले आहे. अमेरिकेत मागील 24 तासांत दीड लाखांहून अधिक नवीन प्रकरणे समोर आली आहेत. यामुळे देशातील बाधितांची संख्या वाढून 20786001 झाली आहे. आतापर्यंत या विषाणूमुळे 3.53 लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. 24 तासांत 1681 कोरोना रुग्णांच्या मृत्यूबरोबर मृतांचा आकडा 3,53,131 पर्यंत गेला आहे. 

अमेरिकेतील जॉन हॉपकिन्स विद्यापीठातील विज्ञान आणि इंजिनिअरिंग केंद्राकडून (सीएसएसई) जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत कोरोनाने विक्राळ रुप धारण केले आहे. मागील 24 तासांत 1 लाख 62 हजार 423 नवीन प्रकरणे समोर आल्याने देशातील बाधितांची संख्या 20786001 पर्यंत पोहोचली आहे. 

अमेरिकेतील न्यूयॉर्क, टेक्सास आणि कॅलिफोर्निया प्रांत कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित आहे. एकट्या न्यूयॉर्कमध्ये 38,599 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. टेक्सासमध्ये आतापर्यंत 28,551 जणांच्या मृत्यूचे कारण कोरोना आहे. कॅलिफोर्नियामध्ये कोविड-19मुळे आतापर्यंत 26,665 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर फ्लोरिडामध्ये कोविड-19 मुळे 22090 जणांचा मृत्यू झाला आहे. 

त्याचबरोबर न्यूजर्सीमध्ये 19,225, इलिनॉयसमध्ये 18,412, मिशिगनमध्ये 13,391, मॅसाच्युटे्समध्ये 12,610 आणि पेनसेल्वेनियामध्ये कोरोनामुळे 16,335 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया, कोलरॅडो आणि फ्लोरिडा प्रांतात ब्रिटनमध्ये नुकताच आढलेला कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे रुग्ण आढळून आल्याचे समोर आले आहे. दरम्यान, देशात फायझर, मॉडर्नाच्या कोरोना लशीला मंजुरी मिळाल्यानंतर लशीकरणाचे अभियान मोठ्याप्रमाणात सुरु झाले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com