esakal | ‘कोरोना व्हायरस’चा फास सुटता सुटेना; मृतांची संख्या १७०० वर
sakal

बोलून बातमी शोधा

Corona-Danger

कोरोना हे चीनचे जैविक शस्त्र आहे का?
नवी दिल्ली ः चीनमध्ये झालेला कोरोना व्हायरसचा उद्रेक म्हणजे चीनने विकसित केलेले जैविक शस्त्र आहे का, असा प्रश्‍न काँग्रेसचे नेत मनीष तिवारी यांनी केला. यासंदर्भात त्यांनी १९८१मधील ‘द आईज ऑफ डार्कनेस’ या विज्ञानकथेवर आधारित कादंबरीचे मुखपृष्ठ आणि त्यातील उतारा ट्विटरवर रविवारी (ता. १६) पोस्ट केला आहे. 

‘कोरोना’च्या भीतीमुळे 

  • बीजिंग येथे ५ मार्चला होणारे नॅशनल पीपल्स काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन स्थगित होण्याची शक्यता. 
  • जपानमधील कोरोना व्हायरसची तीव्रता पाहून सम्राट नारुहितो यांचा सार्वजनिक वाढदिवस सोहळा रद्द.
  • हुबेई प्रांतातील १८ शहरांत बंदजन्य स्थिती.

‘कोरोना व्हायरस’चा फास सुटता सुटेना; मृतांची संख्या १७०० वर

sakal_logo
By
पीटीआय

बीजिंग - कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये गेल्या चोवीस तासांत १०५ जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या १७७० वर पोचली आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने २,०४८ नवीन रुग्ण आढळल्याची माहिती दिली. त्यामुळे आतापर्यंत ७०,५४८ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मृत १०५ पैकी शंभर नागरिक हुबेई प्रांतातील, तर तीन हेनान आणि दोन ग्वाडूंग प्रांतातील नागरिकांचा समावेश आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाबाधित रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू असून आतापर्यंत १०,८४४ जणांना घरी सोडले आहे. मात्र अजूनही ७२६४ जण संशयित असल्याचे राष्ट्रीय आरोग्य आयागेाने म्हटले आहे. जपानच्या योकोहामा बंदरावर गेल्या दोन आठवड्यांपासून उभ्या असलेल्या डायमंड प्रिन्सेस जहाजावर आणखी ९९ जणांना बाधा झाल्याचे आज तपासणीत निष्पन्न झाले आहे.

Coronavirus: कोरोनाग्रस्त डायमंड प्रिन्सेस जहाजावर जपाननं वाटले 2 हजार आयफोन

भारताकडून वैद्यकीय मदत
चीनच्या वुहान शहरासाठी भारत विशेष विमानाने वैद्यकीय मदत पाठवणार आहे. तसेच वुहानमध्ये अडकलेले भारतीयांना परत आणण्याचा विचार केला जात असल्याचे भारतीय दूतावासाने म्हटले आहे.