उ. कोरियात कोरोनाचा कहर

चोवीस तासात सुमारे २ लाख २० हजार जणांना ताप आला आहे
कोरोना
कोरोना sakal

सोल - उत्तर कोरियात कोरोना संसर्गाचा प्रसार सुरूच असून गेल्या चोवीस तासात सुमारे २ लाख २० हजार जणांना ताप आला आहे. दरम्यान, अध्यक्ष किम जोंग उन यांनी देशातील कोरोनाचा वेग कमी करण्यास प्रशासनाला यश येत असल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे २.६ कोटी लोकसंख्येच्या देशात अद्याप एकानेही लस घेतलेली नाही. उत्तर कोरियातील आरोग्य यंत्रणा विस्कळित असून जगात बाजूला पडलेल्या या देशात संसर्गाच्या गंभीर स्थितीने चिंता निर्माण झाली आहे. उत्तर कोरियात कोरोनाच्या लाटेचा वेग कमी करण्यास प्रशासनाला यश असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

अन् जोंग रडले

सरकारी माध्यमाच्या व्हिडिओत उत्तर कोरियाचे वरिष्ठ अधिकारी ह्योन चोल हेई यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी अध्यक्ष किम जोंग उन हे रडताना दिसले. किम यांना नियोजित नेता म्हणून जगासमोर आणण्यास त्यांची महत्त्वाची भूमिका होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com