esakal | चीनकडून आणखी एक मोठी खेळी; जागतिक मंदीचा उचलत आहे फायदा
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus china buying huge crude oil

शेअर बाजारात होणारी घसरण आणि महामारीमुळे कच्च्या तेलाच्या किंमतींचा तो शक्य तितका फायदा चीन घेत आहे.

चीनकडून आणखी एक मोठी खेळी; जागतिक मंदीचा उचलत आहे फायदा

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

कोरोनामुळे जगभरात आर्थिक मंदी आली असतानाच चीन याची वाट पाहत बसलेला असेच चित्र आता पाहायला मिळत आहे. संपूर्ण जग कोरोनाशी लढा देण्यात व्यस्त असताना चीनकडून जगभरातील आर्थिक मंदीचा फायदा घेण्यास सुरवात करण्यात आली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

एकीकडे, संपूर्ण जग स्वत: ला कोरोनापासून वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे, तर दुसरीकडे चीन जगात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करीत आहे. शेअर बाजारात होणारी घसरण आणि महामारीमुळे कच्च्या तेलाच्या किंमतींचा तो शक्य तितका फायदा घेत आहे. स्वस्त कच्च्या तेलामुळे आज तेलाचा मोठा साठा मिळायला लागला आहे. याशिवाय जगभरातील कंपन्यांचे शेअर्स शेअर बाजाराच्या घसरणीमुळे खालच्या पातळीवर गेले आहेत, त्याचा चीन देखील फायदा घेत आहे. स्वस्त दरात शेअर्स खरेदी करून आशियातील बड्या देशांमधील कंपन्यांमध्ये मोठी भागीदारी चीन घेत आहे. 

आणखी वाचा - उद्योजक, व्यवसायिकांसाठी मोठी बातमी

चीनकडे आहे मोठी संधी
कोरोनाच्या संसर्गामुळे सध्या जगभर लॉकडाऊन लावण्यात आला आहे. यामुळे कच्च्या तेलाच्या मागणीत मोठी घसरण झाली असून त्यांच्या किमतीने गेल्या १८ वर्षातील नीचांक गाठला आहे. एका अहवालानुसार, दैव कॅपिटल मार्केट्समधील चीन आणि हाँगकाँग एनर्जी रिसर्चचे प्रमुख डेनिस इप म्हणाले की, ओपेक आणि रशियाने कच्च्या तेलाचे उत्पादन कमी करण्याची अपेक्षा केली असली तरी किंमती किंचित वाढल्या आहेत. तरीही जगातील सर्वात मोठ्या तेल आयात करणार्याअ देशांसाठी, शक्य तितक्या अधिक प्रमाणात पुन्हा साठवणूक करण्याची ही मोठी संधी आहे. गेल्या काही दिवसांत चीनची अर्थव्यवस्था जशी वाढत गेली आहे तसे त्यांचे कच्च्या तेलाचे आयातीकरणाचे प्रमाण ७२ % नी वाढले आहे. बीजिंग शहराच्या वाढत्या उर्जेची मागणी चीनसाठी महत्वाचे आहे व ते यांवर लक्ष केंद्रित करून आहेत. सरकारी तेल कंपन्यांमधील उत्पादन वाढवण्याव्यतिरिक्त त्यांनी आपले तेल साठे वाढवण्यासाठी अनेक वर्षे काम केले आहे. सीएनपीसीच्या मते, चीनने गेल्या वर्षी १९१ दशलक्ष टन कच्चे तेलाचे उत्पादन केले होते, जे त्यांच्या वार्षिक वापराच्या ३०% आहे. 

आणखी वाचा - वय ६२ वर्ष, तरीही रोज उन्हात पनवेल ते वडाळा प्रवास करून करतायत रुग्णसेवा

चीनकडून आणखी एक मोठी गुंतवणूक
चीनने गृहनिर्माण कर्ज कंपनी एचडीएफसी लिमिटेडचे १.७५ कोटी शेअर्स खरेदी केले आहेत. शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, चीनच्या मध्यवर्ती बँकेने एचडीएफसी लिमिटेडचे १,७४,९२,९०९ शेअर्स खरेदी केले आहेत, जे कंपनीतील एक टक्का भागभांडवल आहेत. या जागतिक मंदीच्या काळात हि खूप मोठी गुंतवणूक मानली जात आहे. चीनकडून इतर अनेक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक सध्या सुरु असून या गुंतवणुकीचा परिणाम कोरोनाच्या नंतर मोठ्या प्रमाणावर आर्थिक आणीबाणी आणण्यासाठी चीनकडून वापरण्यात येऊ शकतो.

loading image