esakal | इटलीच्या मदतीला धावून आला एकमेव देश; आरोग्य सेवेची त्यांची मोठी परंपरा
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus cuba medical team arrived italy milan information marathi

रोगराईच्या काळात कायम इतर देशांच्या मदतीला धावून जाणारा क्युबा यावेळी इटलीच्या पाठिशी उभा राहिला आहे.

इटलीच्या मदतीला धावून आला एकमेव देश; आरोग्य सेवेची त्यांची मोठी परंपरा

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

रोम Coronavirus:संपूर्ण जगात हाहाकार माजवणाऱ्या कोरोना व्हायरसनं चीननंतर इटलीमध्ये सर्वांत जास्त बळी घेतले आहेत. इटली मुळातच चांगल्या आरोग्य सेवेसाठी ओळखला जाणारा देश होता. पण, कोरोनानं जगभरात रौद्र रूप धारण केल्यामुळं इटलीच्या मदतीला एकही देश आला नाही. पण, आरोग्य सेवेची मोठी परंपरा असलेला क्युबा इटलीच्या मदतीला धावून आलाय. क्युबातील डॉक्टराचं एक पथक इटलीमध्ये दाखल झालंय. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

इटलीत जोरदार स्वागत
रोगराईच्या काळात कायम इतर देशांच्या मदतीला धावून जाणारा क्युबा यावेळी इटलीच्या पाठिशी उभा राहिला आहे. इटलीतील कोरोनाची साथ आटोक्यात आणण्याचं आव्हान केवळ इटलीसमोर नाही तर, संपूर्ण जगासमोर आहे. सध्याच्या घडीला प्रत्येक देशात कोरोनानं शिरकाव केल्यामुळं इटलीच्या मदतीला एकही देश पुढं आला नाही. क्युबानं मात्र, रोगराईशी दोन हात करण्याची परंपरा कायम ठेवत, आपलं पथक इटलीला रवाना केलं. क्युबामधील 53 तज्ज्ञ डॉक्टरांच पथक सध्या इटलीमध्ये दाखल झालंय. 22 मार्च रोजी हे पथक क्युबाची राजधानी हवानामधून रवाना झाले होते. सध्या त्यांनी इटलीमध्ये काम सुरू केल्याचीही माहिती आहे. इटलीच्या विमानतळावर या डॉक्टरांची जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. इटलीसाठी क्युबाच्या डॉक्टरांचे हे पथक जणू देवदुतांसारखे मानले जात आहे. या पथकात अतिदक्षता विभागातील तज्ज्ञांचा समावेश आहे. 

कोरोनाशी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

काय करणार क्युबाचे डॉक्टर?
क्युबाचे डॉक्टर प्रमुख्यानं रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी काम करणार आहेत. क्युबाचे इंटरफेरोन अल्फा-2बी हे औषध एखाद्याच्या शरिरावर जादू सारखे काम करते, असा दावा करण्यात येतो. वेगवेगळ्या प्रकारच्या व्हायरल इन्फेक्शनमध्ये या औषधाचा वापर केला जातो. हे औषध रुग्णांच्या शरिरातील व्हायरल इऩ्फेक्शन कमी करण्याचे काम करते.

आणखी वाचा - भारतात 21 दिवस लॉक डाऊन

क्युबामध्येही कोरोना रुग्ण?
जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसनं क्युबामध्येही शिरकाव केलाय. पण, क्युबा या परिस्थितीतही खंबीर आहे. क्युबामध्ये जवळपास एक हजार संशयित रुग्ण असून,  35हून अधिक जणांना कोरोनाची लागण झाल्याची अधिकृत माहिती आहे. पण, या स्थितीतही क्युबाने आपल्यादेशाबाहेर आरोग्य पथके रवाना केली आहेत. सध्या व्हेनेझुएला, जमैका, निकारगुआ, सुरिनाम, ग्रेनेडा या देशांमध्ये क्युबाची आरोग्य पथके काम करत आहेत. 

कोरोनाशी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आम्हालाही धास्ती आहे. पण, आम्हाला एक क्रांतीकारी कर्तव्य पार पाडायचे आहे. त्यामुळं आम्ही सगळ्या शंका, भीतीला बाजूला ठेवून इटलीत पाऊल ठेवले आहे. कोणी तरी म्हटलं होतं की, सूपरहिरो कोणालाही घाबरत नाहीत. पण, आम्ही सूपरहिरो नाही तर आम्ही क्रांतीकारी डॉक्टर आहोत.
- डॉ. लिओनार्दो फेर्नांडिस, अतिदक्षता विभाग तज्ज्ञ

क्युबाच का?
जगातील सर्वोत्तम आरोग्य सुविधांमध्ये क्युबाच्या आरोग्य सुविधांचा उल्लेख केला जातो. औषधांमधील संशोधन असो किंवा आरोग्य सुविधा, अमेरिका आणि लॅटिन अमेरिकेच्या दरम्यान असलेले क्युबा नावाचे छोटेसे बेट हे कायम आघाडीवर राहिले आहे. जगभरात रोगराईच्या घटनांमध्ये कायम क्युबाने पुढाकार घेऊन आरोग्य सेवेसाठी काम केले आहे. 2017मध्ये इबोलाची साथ आल्यानंतरही क्युबाच्या आरोग्य पथकानं अफ्रिकेत काम केले होते. एवढेच नव्हे तर, कायम शत्रू राष्ट्र म्हटल्या गेलेल्या अमेरिकेतही क्युबाच्या डॉक्टरांनी आरोग्य सेवा केली आहे.