Coronavirus : कोरोनामुळे अनेकजण चिंताग्रस्त; मृतांची संख्या...

वृत्तसंस्था
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

- दोन हजार नवीन रुग्ण

- चोवीस तासांत ९७ जण मृत्युमुखी 

- ४४,६५३ जणांना कोरोनाची बाधा

बीजिंग : चीनमध्ये कोरोना विषाणू संसर्गाने आणखी ९७ जणांचा मृत्यू झाला असून, एकूण मृतांची संख्या आता १,११३ वर पोचली आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ४४,६५३ वर पोचली आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने आज ३१ प्रांतात २,०१५ नवीन रुग्ण आढळल्याचे सांगितले. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना संसर्गाला कोव्हीड-१९ (सीओव्हीआयडी) असे नाव दिले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चीनमध्ये कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव वाढत असल्याने प्रतिबंधात्मक उपाय केले जात आहेत. गेल्या चोवीस तासांत मृत्युमुखी पडलेल्या ९७ जणांपैकी ९४ जण हुवेई प्रांतातील असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. संसर्गाची सर्वाधिक लागण याच प्रांतात झाली आहे. याशिवाय हेनान, हुनान, चेग्किंग येथे प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. काल या आजाराशी निगडित ३३४२ नवीन प्रकरणे समोर आले आहेत. काल देशात ८७१ रुग्ण गंभीर होते आणि ७४४ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. आतापर्यंत एकूण ४७४० जणांना घरी सोडले आहे.

Image result for corona virus

चीनमध्ये आतापर्यंत ४४,६५३ जणांना कोरोनाची बाधा झाली असून, त्यापैकी १११३ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. राष्ट्रीय आरोग्य आयोगानुसार देशात एकूण ८२०४ जणांची स्थिती गंभीर असून, १६,०६७ जणांना लागण झाली आहे. जगभरातील ४.५१ लाख संशयितांची तपासणी करण्यात आली असून, १.८५ लाख नागरिकांवर लक्ष ठेवले जात आहे.

हॉंगकॉंगमध्ये ४९ नवीन रुग्ण 

हॉंगकॉंगमध्ये कालपर्यंत कोरोनो व्हायरसचे ४९ रुग्ण आढळून आले असून, यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. मकाऊ येथे दहा आणि तैवान येथे १८ नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

Image result for death

गेल्या वर्षी हुवेई प्रांताची राजधानी वुहान येथे जंगली जनावरांच्या बाजारातूनच कोरोना व्हायरसचा प्रसार झाल्याचे सांगण्यात येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख तेदरोस अदहानोम गेब्रेयसेस यांच्या मते, कोरोनाचे ९९ टक्के प्रकरणे चीनमध्ये आहेत, मात्र हा व्हायरस जगासाठी धोकादायक ठरत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus death toll surpasses 1100