कोरोना विषाणूच्या उगमाबाबत आली मोठी बातमी, जाणून घ्या...

wuhan market
wuhan market

covid-19 पसरण्याची सुरुवात चीनच्या वुहान शहारातील मांस मार्केटमधून झाली नसल्याचा दावा वुहान इन्सटिट्यूट ऑफ वायरोलॉजीने(WIV) केला आहे. मांस मार्केट हे कोरोना व्हायरस पसरण्याचे केंद्र बनले होते, मात्र हा व्हायरस बाहेरुन आला असल्याचं वैज्ञानिकांचं म्हणणं आहे.

सुरुवातीच्या माहितीनुसार असं मानलं जात होतं की, covid-19 चा प्रसार वुहानच्या मांस मार्केटमधील प्राण्याकडून माणसाकडे झाला. मात्र, डब्लूआयव्हीच्या वैज्ञानिकांनी हा दावा फेटाळला आहे. कोरोना व्हायरसचा उगम या मार्केटमध्ये झाला नाही. कारण आम्ही केलेल्या अभ्यासातून हे स्पष्ट झालं आहे, असं जिओगेटोल विद्यापीठातील प्राध्यापक कोलीन कार्लसन यांनी म्हटलं आहे. कोलीन प्राण्यांमधून माणसांमध्ये येणाऱ्या विषाणूचा अभ्यास करतात. 

विषाणूचा प्रसार प्राण्याकडून माणसाकडे होण्यासाठी एका होस्ट प्राण्याची आवश्यकता असते. जो माध्यम म्हणून काम करतो. विषाणू प्राण्याकडून माणसाकडे जाण्याआधी तो एका प्राण्याकडून दुसऱ्या प्राण्याकडे जातो. कोरोना विषाणूचा प्रसार चीनमध्ये वटवाघूळापासून झाल्याचा अंदाज आहे.

चीनमधील मांस मार्केटमध्ये विविध प्रकारचे प्राणी ठेवले जातात. आणि या प्राण्यांच्या संपर्कात मानव आल्याने विषाणूचा प्रसार होऊ शकतो. चीनमध्ये सुरुवातीला सापडलेले रुग्ण वुहान मांस मार्केटशी संबंधित होते. वैज्ञानिकांनी या मार्केटमधील प्राण्यांच्या चाचण्या घेतल्या तेव्हा येथील प्राण्यांमध्ये विषाणू नसल्याचं आढळलं. विषाणूचा प्रसार होण्यासाठी एका प्राण्याकडून दुसऱ्या प्राण्याकडे ते जाणे आवश्यक असते. त्यामुळे विषाणुचा प्रसार या मार्केटमधून न होता बाहेरुन झाल्याचं वैज्ञानिकांनी म्हटलं आहे.

कोरोना विषाणुचा उगम कोठे झाला हे सांगणं अवघड आहे. वुहान मांस मार्केटमध्ये विविध प्रकारचे प्राणी-पक्षी विक्रीसाठी आणले जातात. त्यामुळे अशी शंका येणे साहजिक आहे. पण, आपण कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू शकत नाही. अभ्यासासाठी वेळ द्यावा लागतो. सार्सची साथ 2002 साली आली होती. पण त्याचा उगम आणि कारण शोधण्यास 15 वर्षे लागली, असं कार्लसन म्हणाले आहे.

दरम्यान, कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण चीनच्या वुहान शहरात सापडला होता. त्यानंतर हा विषाणू जगभर पसरला आहे. covid-19 ची बाधा जगातील 56 लाख लोकांना झाली आहे, तर या विषाणूने 3.50 लाख लोकांचा बळी घेतला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com