ऑफिसला बोलावल्यास वाढतंय राजीनाम्यांचं प्रमाण

ऑफिसला बोलावलं तर राजीनामे देऊ; कर्मचाऱ्यांना लागली 'Work From Home'ची गोडी
work from home handle home work and health
work from home handle home work and health

कोरोना काळात अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम (work from home) करण्याचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे वर्षभरापासून अनेक जण घरुनच काम करत आहेत. विशेष म्हणजे सुरुवातीच्या काळात अनेकांना घरुन काम करण्याचा कंटाळा येत होता. मात्र, आता हेच वर्क फ्रॉम होम कर्मचाऱ्यांना आवडू लागलं आहे. विशेष म्हणजे वर्षभर घरी राहून काम केल्यानंतर ज्या कंपन्या कर्मचाऱ्यांना आता ऑफिसमध्ये बोलावू लागल्या आहेत. त्या कंपन्यांमधील कर्मचारी राजीनामा देत असल्याचं समोर आलं आहे. (coronavirus-employees-wont-return-office-after-work-from-home-mode-is-over)

एप्रिलमध्ये केला सर्व्हे

एप्रिल महिन्यात फ्लेक्स जॉब्स या कंपनीने एक सर्व्हे केला. हा सर्व्हे २१०० कर्मचाऱ्यांवर करण्यात आला होता. यात निम्म्याहून अधिक जणांनी वर्क फ्रॉम होम करण्याला पसंती दिली. सोबतच वर्क फ्रॉम होम कंटिन्यू करावं अशी मागणीही त्यांनी केली. विशेष म्हणजे वर्क फ्रॉम होममुळे प्रवास खर्च, वेळ यांची बचत होते. तसंच ऑफिसमध्ये होणाऱ्या पॉलिटिक्सपासून दूर राहता येतं, असं कर्मचाऱ्यांनी सांगितलं.

work from home handle home work and health
कोडं उलगडलं; झारखंडमध्ये दिसलेली ती आकृती एलियनची होती का?

७० टक्के कंपन्यांचा आहे वर्क फ्रॉम होमला कौल

ग्लोबल मार्केट रिसर्च फर्म फोरकास्टरनुसार, यूएस आणि युरोपमधील ७० टक्के मल्टीनॅशनल कंपन्यांनी हायब्रिड वर्क कल्चरला कौल दिला आहे. तर, ३० टक्के कंपन्यांच्या मते, कर्मचाऱ्यांनी ऑफिसला येणं गरजेच आहे असं म्हटलं आहे. विशेष म्हणजे यात अर्ध्याहून अधिक कंपन्यांनी हायब्रिड वर्क कल्चर सुरु केलं आहे.

हायब्रिड वर्क कल्चरला गुगल, फोर्डसारख्या कंपन्यांचीही पसंती

हायब्रिड वर्क कल्चरला गुगल, फोर्ड आणि सिटी ग्रुपसारख्या मोठ्या कंपन्यांनीदेखील पसंती दिली आहे. विशेष म्हणजे यापूर्वीदेखील या कंपन्यांनी अनेकदा हायब्रिड वर्क कल्चरप्रमाणे काम केलं आहे.

कर्मचारी देतायेत राजीनामा

ज्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम बंद करुन ऑफिसमध्ये येण्यास सांगण्यात येत आहे

ज्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये येण्यास सांगितलं आहे. त्या कंपन्यांमधील अनेक कर्मचाऱ्यांनी राजीनामे दिली आहेत. ऑफिसमध्ये येण्याऐवजी घरी काम करुन नाही तर राजीनामे देऊ अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. विशेष म्हणजे ज्या कंपनीमध्ये वर्क फ्रॉम होमची सुविधा आहे अशा कंपन्यांचा शोध सध्या अनेक जण घेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com