इटलीच्या रस्त्यांवर पडून आहेत शेकडो मृतदेह; जाणून घ्या वास्तव

वृत्तसंस्था
मंगळवार, 24 मार्च 2020

कोरोना व्हायरसचा इटलीला मोठा फटका बसला आहे. इटलीमधील रस्त्यावर शेकडो मृतदेह पडल्याचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, संबंधित छायाचित्राचा कोरोना व्हायसशी कोणताही संबंध नाही.

रोम (इटली): कोरोना व्हायरसचा इटलीला मोठा फटका बसला आहे. इटलीमधील रस्त्यावर शेकडो मृतदेह पडल्याचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, संबंधित छायाचित्राचा कोरोना व्हायसशी कोणताही संबंध नाही.

...म्हणून आयटीमधील युवती करतेय जीवाचं रान

करोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून, याचा सर्वात जास्त फटका बसलेल्या देशांमध्ये इटलीचा समावेश आहे. इटलीत एकाच दिवसात हजारो लोकांच्या मृत्यूची नोंद होत आहे. सोशल मीडियावर इटलीमधील भीषण परिस्थिती दर्शवणारे अनेक फोटो सध्या व्हायरल होत आहेत. अशा प्रकारचे एक छायाचित्र मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागले आहे. या छायाचित्रात मोठ्या संख्येने लोकांचे मृतदेह रस्त्यावर पडलेले दिसत असून, हे छायाचित्र इटलीमधील असल्याचा दावा केला जात आहे.

देशात लॉकडाउन अन् जोडप्याचे मोटारीत नको ते उद्योग...

पण, या छायाचित्राचा आणि करोना व्हायरसशी काहीही संबंध नाही. हे छायाचित्र जर्मनीमधील फ्रँकफर्ट येथील आहे. २४ मार्च २०१४ मध्ये घेण्यात आलेला हा फोटो एका आर्ट प्रोजेक्टचा भाग होता. नाझींच्या छळछावणीत मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी लोक अशा पद्दतीने रस्त्यावर झोपले होते. १९४५ रोजी हिटलरने नाझी कॅम्पमध्ये ५२८ ज्यू नागरिकांना ठार केले होते. त्या सर्वांचे मृतदेह फ्रँकफर्ट येथील केंद्रीय दफनभूमीत दफन करण्यात आले होते. या सर्व पीडितांना श्रद्धांजली वाहण्यासाठी २४ मार्च २०१४ मध्ये आर्ट प्रोजेक्ट आयोजित करण्यात आला होता.

विशेष म्हणजे जानेवारी महिन्यातही हेच छायाचित्र चीनमधील असल्याचे व्हायरल झाले होते. यामुळे सोशल मीडियावर अफवांना उत येत आहे.

दोघांना एकत्र पाहिले त्याच वेळी ठरवले...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus fact check on viral photo claiming dead bodies lying on the road in italy

टॅग्स
टॉपिकस