Coronavirus : आता 23 खासदारांना कोरोनाची लागण

वृत्तसंस्था
बुधवार, 4 मार्च 2020

70 देशांमध्ये कोरोना व्हायरसची लागण

तेहरान : कोरोना व्हायरसने जगभरात अक्षरश: थैमान घातले आहे. कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. इराणमध्ये परिस्थिती गंभीर बनली असून, 23 खासदारांना कोरोनाची लागण झाली. तर 77 जणांचा मृत्यू झाला. 

ताज्या बातम्यांसाठी करा ई-सकाळचे ऍप    

चीननंतर आता इटली, दक्षिण कोरिया आणि इराणमधील नागरिकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. इराणमध्ये परिस्थिती इतकी गंभीर बनली आहे, की येथे आतापर्यंत 77 जणांचा मृत्यू झाला. 23 खासदारांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तसेच यामध्ये काही महत्त्वाच्या व्यक्तींचाही समावेश आहे.

coronavirus

70 देशांमध्ये कोरोना व्हायरसची लागण

आतापर्यंत जवळपास 70 देशांमध्ये कोरोना व्हायरची लागण झाली आहे. कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी आता इराणने लष्कराची मदत घेतली आहे. सुमारे 30 हजार लष्कराचे जवान आणि स्वयंसेवकांना मदत व बचावकार्यात उतरवण्यात आले आहे.

भारतात 28 जणांना कोरोनाची लागण

कोरोना व्हायरसने आता भारतातही धुमाकूळ घातला आहे. त्यानंतर आत्तापर्यंत 28 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus Iran calls on army for help as 23 MPs infected

टॅग्स
टॉपिकस