esakal | कोरोनाची इराणमध्ये जास्त गंभीर स्थिती; काय आहे कारण?
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus iran situation 77 dead more than two thousand infected

इराणमध्ये एखाद्या रोगामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची ही आजवरची सगळ्यांत मोठी संख्या असल्याचे इराणचे प्रमुख नेते अयातुल्ला अली खेमेनी यांनी, स्पष्ट केले आहे.

कोरोनाची इराणमध्ये जास्त गंभीर स्थिती; काय आहे कारण?

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

तेहरान Iran : चीन आणि दक्षिण कोरिया पाठोपाठ इराणमध्ये कोरोना व्हायरसचा धोका वाढू लागला आहे. इराणमध्ये आतापर्यंत अडीच हजार जणांना कोरोनाची लागण झाली असून, 77 जणांचा बळी गेला आहे. इराणच्या आरोग्य खात्याचे मंत्री अली रेझा रैसी यांनी मीडियाला ही माहिती दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

बड्या नेत्याचा मृत्यू?
इराणमध्ये एखाद्या रोगामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची ही आजवरची सगळ्यांत मोठी संख्या असल्याचे इराणचे प्रमुख नेते अयातुल्ला अली खेमेनी यांनी, स्पष्ट केले आहे. सध्या चीन आणि दक्षिण कोरियानंतर इराणमध्ये कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. सध्या इराणच्या लष्कराला आरोग्य खात्याला लागणारी हवी ती मदत देण्याचे आदेश, खेमेनी यांनी दिले आहेत. भारतात इराणमधून आलेल्या एका व्यक्तीला करोनाची लागण झाल्याचा संशय असून, महाराष्ट्रात नाशिकमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, इराण सरकार कोरोनाग्रस्तांची जी संख्या जाहीर करत आहे, त्यापेक्षा जास्त रुग्ण असल्याचा संशय इराणच्या जनतेतून व्यक्त होत आहे. त्यामुळं इराण सरकारवर टीका केली जात आहे. इराणच्या विस्तार परिषदेचे सदस्य मोहम्मद मोहम्मदी यांचा कोरोना व्हायरसमुळं मृत्यू झाल्याची माहिती आहे. मात्र इराण सरकारने या वृत्ताला दुजोर दिला नसल्याचे बोलले जात आहे. 

जगभरातील घडामोडी वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

इराणविषयी चिंता का?
जगभरात कोरोना व्हायरसची लागण होत असताना, इराणमधील कोरोनाविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. कारण, इराणमध्ये रोगाची लागण झालेले आणि मृत्यूमुखी पडलेले यातली टक्केवारी 4.4 टक्के आहे. ही टक्केवारी इतर देशातील बळींपेक्षा जास्त आहे. त्यामुळं इराणमध्ये रोगाची व्याप्ती कमी दिसत असली तरी, मृत्यूंची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळं जगभरातून इराणमधील कोरोनाविषयी जास्त चिंता व्यक्त होत आहे. दरम्यान, इराणचा शेजारी सौदी अरेबिया आणि जॉर्डन येथेही कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

जगभरातील घडामोडी वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोना व्हायरस रोखण्यासाठी आणि सार्वजनिक आरोग्यासाठी जे काही करण्यात येईल ते चांगले आहे हा रोग पसरण्यासाठी जे काही केलं जाईल ते पाप आहे. 
- अयातुल्ला अली खेमेनी, अध्यक्ष, नेते इराण

loading image