नुकताच जन्मला अन् अडकला 'कोरोना'च्या जाळ्यात

वृत्तसंस्था
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

वुहान शहरातील एका रुग्णालयात बाळाचा जन्म होताच 30 तासात तो कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. त्याला आईलाही कोरोना झाला असून, या दोघांवर उपचार सुरु आहेत. या बाळाचे वजन 3.25 किलो असून, त्याला डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. 

वुहान : चीनमध्ये कोराना व्हायरसच्या उद्रेक झाला असून, दररोज मृतांच्या संख्येत वाढच होत आहे. चीनमध्ये कोरोना विळख्यात अडकलेल्या सर्वांत तरुण रुग्णाची नोंद झाली असून, जन्मल्यानंतर अवघ्या 30 तासांतच बाळाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये मरण पावलेल्यांची संख्या पाचशेच्या वर पोचली असून 24 हजार 342 लोकांना या आजार झाला असल्याची माहिती चीनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. चीनमधील 31 प्रांतनिहाय भागांमधील 24 हजार 324 जणांना या विषाणूची लागण झाल्याचे कालपर्यंत निष्पन्न झाले असल्याचे राष्ट्रीय आरोग्य आयोगाने सांगितले. या विषाणूचा संसर्ग झालेले 3 हजार 887 नवे रुग्ण आढळले आहेत. कोरोना व्हायरस हा आजार गेल्या काही वर्षांतील अत्यंत घातक समजला जात असून त्यातून बाहेर पडण्याचा उपाय सध्या तरी दिसत नसला तरी त्याचा फैलाव रोखण्यासाठी चीन युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे.

वुहान शहरातील एका रुग्णालयात बाळाचा जन्म होताच 30 तासात तो कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. त्याला आईलाही कोरोना झाला असून, या दोघांवर उपचार सुरु आहेत. या बाळाचे वजन 3.25 किलो असून, त्याला डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus Newborn becomes youngest person diagnosed with virus