Coronavirus : अखेर पहिला कोरोनाग्रस्त रुग्ण सापडला

वृत्तसंस्था
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

विक्री परिषदेला उपस्थित

- असा पसरला कोरोना

लंडन : जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले. यामध्ये आत्तापर्यंत 1500 हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला. मात्र, हा व्हायरस कोणामुळे पसरला ती व्यक्ती आता सापडली आहे. स्टिव्ह वॉल्श असे संबंधित व्यक्तीचे नाव आहे. तो व्यावसायिक आहे. या व्यक्तीवर कोरोना व्हायरस पसरवल्याचा संशय होता. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाची लागण झाल्याचे समजल्यानंतर स्टिव्ह यांच्यावर लंडनमधील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्टिव्ह आता पूर्णपणे बरे झाले आहेत. मात्र, त्यांच्या माध्यमातून कोरोना व्हायरस अनेक देशांमध्ये पसरला आहे. 

Image result for first corona patient

विक्री परिषदेला उपस्थित

जानेवारी महिन्यात झालेल्या सर्वोमॅक्सच्या विक्री परिषदेला स्टिव्ह ब्रिटनमधील गॅस अ‍ॅनलिटिक्स कंपनी येथे गेले होते. तिथेच त्यांना कोरोना व्हायरसची बाधा झाली.

असा पसरला कोरोना

विक्री परिषदेत उपस्थित असलेल्यांना कोरोना व्हायरसच्या संपर्कात आहोत, याची कुठलीच कल्पनाही नव्हती. या परिषदेहून मलेशियाला परतलेल्या एका व्यक्तीच्या शरीरात कोरोना विषाणू आढळला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus Super Spreader Steve Walsh out danger

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: