चिंताजनक : आठ पट वेगाने पसरतोय कोरोना; चीनच्या बाहेर जास्त घातक; जाणून घ्या, बळींचा आकडा!

टीम ई-सकाळ
Tuesday, 3 March 2020

सध्या दक्षिण कोरियामध्ये सर्वाधिक तपासणी केली जात आहे. चीननंतर दक्षिण कोरियात सर्वाधिक चिंतेचा विषय आहे.

जिनिव्हा Coronavirus : गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांमध्ये डॉक्टरांना दिसून आलेल्या एका निरीक्षणामुळे कोरोनाबाबतची काळजी आणखी वाढवली आहे. कोरोना जेवढा चीनमध्ये घातक आहे, त्यापेक्षा जास्त घातक तो चीन बाहेर असल्याचे या रिपोर्टमधून दिसून आले. चीनमधील तीव्रतेच्या ८ पट जास्त तीव्रतेने कोरोना इतर देशांमध्ये पसरत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) म्हटले आहे. तसेच जगभरात कोरोनाचा प्रसार होण्याची दाट शक्यता असल्याचेही संघटनेने म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

जगभरात फैलाव
या संदर्भात जागतिक व्यापार संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधनोम घेब्रेयसस यांनी जिनिव्हा येथे माध्यामांशी संवाद साधला त्यात घेब्रेयसस म्हणाले, 'चीनपेक्षा आता दक्षिण कोरिया, इटली, इराण आणि जपानमध्ये पसरत असलेला कोरोना व्हायरस सर्वाधिक घातक आहे. सध्या दक्षिण कोरियामध्ये सर्वाधिक तपासणी केली जात आहे. चीननंतर दक्षिण कोरियात सर्वाधिक चिंतेचा विषय आहे. सध्या जगभरातील 70 देशांमध्ये कोरोना व्हायरसचा फैलाव झाला आहे. तर, तीन हजार जणांचा या व्हायरसमुळं मृत्यू झाला आहे. सध्या भारतात दिल्ली आणि तेलंगणमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळल्यानं भारतातची चिंता वाढली आहे. या दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्यावर डॉक्टरांचे पथक बारिकाने लक्ष ठेवून आहेत. यापूर्वी केरळमध्ये तिघांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली होती. त्यांच्या चाचण पॉझिटिव्ह आल्या होत्या. त्या तिघांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची माहिती असून, तिघेही रिकव्हर झाल्याचे माहिती आहे. 

Image may contain: text

जगभरातील इतर घडामोडींसाठी येथे ► क्लिक करा

त्या पर्यटकांचा व्हिसा रद्द 
दरम्यान, भारताने व्हिसाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. जपान, दक्षिण कोरिया, इटली, इराणच्या नागरिकांना 3 मार्चपूर्वी देण्यात आलेला व्हिसा भारताकडून तातडीने रद्द करण्यात आला आहे. तसेच 3 मार्चपूर्वी भारतात आलेल्या पर्यटकांची माहिती घेण्यासही सुरुवात केली आहे. चीन, दक्षिण कोरियातून अनेक पर्यटक भारतात आले आहेत. तसेच युरोपमधून इटलीहूनही अनेक पर्यटकांनी भारतात प्रवेश केला. त्यांची माहिती घेण्यासाठी आता हॉटेल्सना माहिती कळविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशात आग्रा येथे आलेल्या पर्यटकांची माहिती देण्याचे आदेश हॉटेल्सना देण्यात आले आहेत. तेथील जिल्हा शल्य चिकित्सकांना याची माहिती देण्याचे आदेश आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus who statement worrying situation worldwide