रणधुमाळी ठरणार खर्चिक; आकडा तब्बल ११ अब्ज डॉलर

यूएनआय
Saturday, 10 October 2020

सेंटर फॉर रिस्पॉन्सिव पॉलिटिक्स या संस्थेच्या अंदाजानुसार या आकड्याचे रुपयांतील रूपांतर 79 हजार कोटी इतके असेल. गत वर्षी भारतात झालेल्या लोकसभा निवडणूकीच्या तुलनेत ही रक्कम 50 टक्के जास्त आहे. तेव्हा भारतातील निवडणूक जगातील सर्वाधिक खर्चाची ठरल्याचे मानले गेले होते.

वॉशिंग्टन - अमेरिकेतील अध्यक्षपदाची आगामी निवडणूक विक्रमी खर्चाची होईल. मागील निवडणुकीच्या तुलनेत 50 टक्के खर्च जास्त होईल, जो 11 अब्ज डॉलरच्या घरात असेल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सेंटर फॉर रिस्पॉन्सिव पॉलिटिक्स या संस्थेच्या अंदाजानुसार या आकड्याचे रुपयांतील रूपांतर 79 हजार कोटी इतके असेल. गत वर्षी भारतात झालेल्या लोकसभा निवडणूकीच्या तुलनेत ही रक्कम 50 टक्के जास्त आहे. तेव्हा भारतातील निवडणूक जगातील सर्वाधिक खर्चाची ठरल्याचे मानले गेले होते.

ओपन सिक्रेट्स या संकेतस्थळानुसार सरकारी समित्यांनी आतापर्यंत 7.2 अब्ज डॉलर खर्च केले आहेत. 15 ऑक्टोबरपर्यंत ते आणखी वाढू शकतात. तेव्हा उमेदवार जुलै ते सप्टेंबर या कालावधीतील खर्चाचा तपशील सादर करतील.

पाकिस्तानकडूनही टिकटॉकवर बंदी; देशाच्या सुरक्षेचं नाही तर सांगितलं वेगळंच कारण

कोरोनाचा परिणाम

  • कोरोना साथीमुळे प्रचारावरील खर्चाचे स्वरूप बदलले
  • 2016 मध्ये प्रवास आणि सभा, उपक्रम आदींवरील खर्च जास्त
  • या वेळी कोरोना निर्बंधांमुळे प्रसार माध्यमांवरील खर्चात कित्येक पटींनी वाढ

Edited By - Prashant Patil

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cost of the election war will be expenditure 11 billion