होय हे खरंय! एका देशात लष्करच नाही, तरीही सर्व सुरळीत चालतं!

कार्तिक पुजारी
सोमवार, 29 जून 2020

प्रत्येक देशाला लष्कराची आवश्यकता असते असं तुम्ही छातीठोकपणे सांगाल. पण जगात असा एक देश आहे ज्या देशामध्ये लष्कर नाही आणि तरीही तो देश गुण्यागोविंदाने नांदत आहे.  तुमचा विश्वास बसत नसला तरी दक्षिण अमेरिकेत असा एक देश आहे. ग्रेनेडा त्या देशाचं नाव.

प्रत्येक देशाला लष्कराची आवश्यकता असते असं तुम्ही छातीठोकपणे सांगाल. पण जगात असा एक देश आहे ज्या देशामध्ये लष्कर नाही आणि तरीही तो देश गुण्यागोविंदाने नांदत आहे.  तुमचा विश्वास बसत नसला तरी दक्षिण अमेरिकेत असा एक देश आहे. ग्रेनेडा त्या देशाचं नाव. या देशात एकही सैनिक नाही. शिवाय या देशात जे पोलिस असतात त्यांच्याकडे कोणतंही शस्त्र नसते. 

कॅरेबियन समुद्रातील एक छोटासा देश

लष्करी क्षमतेने बलाढ्य असणारे देश आपल्याला माहिती आहेत. अमेरिका, चिन, रशिया, भारत या देशांकडे असणाऱ्या लष्कराबाबात आणि त्यांच्याकडील शस्त्रांबाबत आपण नेहमीच रस घेऊन वाचतो, ऐकतो. मात्र, जगात लष्कराशिवायही काही देश आनंदाने राहू शकतात हे ग्रेनेडा देशाकडे पाहून समजतं. ग्रेनेडा हा कॅरेबियन समुद्रातील एक सार्वभौम देश आहे. या देशाच्या उत्तरेला त्रिणिदाद आणि तोबागो, तर दक्षिणेला व्हेनेझुयला हा देश आहे. या देशाचे क्षेत्रफळ अवघं 348.5 चौ. किमी. असून लोकसंख्या 1 लाख 13 हजार इतकी आहे. 
नागरिकांना सल्ला देणारे डोनाल्ड ट्रम्प स्वत: मास्क का वापरत नाहीत? जाणून घ्या...

Image

सर्वाधिक सुरक्षित देशांच्या यादीमध्ये समावेश

ब्रिटिशांच्या अमलाखाली असणाऱ्या या देशाला 1974 साली स्वातंत्र मिळाले. तेव्हापासून आजपर्यंत या देशाला आपलंही लष्कर असावं असं कधी वाटलं नाही. लष्कर नाही म्हणजे हा देश कायम भीतीच्या छायेखाली वावरत असेल असं आपल्याला वाटू शकतं, पण तसंही नाही. सर्वाधिक सुरक्षित देशांमध्ये ग्रेनेडाचा समावेश होते. तसेच ग्रेनेडाच्या नागरिकांनीही देशात लष्कर नकोच अशीच भूमिका वेळोवेळी घेतली आहे. शांतताप्रिय असणाऱ्या या देशात सर्व नागरिक आनंदाने राहत आहेत. 

...म्हणून भारत-चीनच्या सैनिकांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला; केंद्रीय मंत्री व्ही.
ग्रेनेडामध्ये गुन्हेगारी घटनांचे प्रमाण अत्यंत कमी आहे. शिवाय अनेक नागरिक बाहेर जाताना आपल्या घराला कुलूपही लावून जात नाहीत. या देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे पर्यटनावर अवलंबून आहे. या देशाला सौंदर्याची देणगी मिळाली आहे. निसर्गरम्य वातावरण आणि स्वच्छ समुद्र किनारे यामुळे अनेक लोक येथे पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येत असतात. निसर्गाने सर्वत्र केलेली सौंदर्याची उधळण पाहण्यासाठी विविध देशातील नागरिक आवर्जुन येथे येतात.
Image

लष्करावरील खर्च केला जातो विकासावर

लष्कर नसल्याचे या देशाने खूप फायदे करुन घेतले आहेत. ग्रेनेडाने लष्करावरील खर्च टाळून तो विकास कामांवर केला आहे. या देशाचे समुद्र किनारी स्वच्छ आणि डोळ्याचे पारणे फेडणारे आहेत. समुद्र किनाऱ्यावर निवांत उण खात बसण्यासाठी अनेक नागरिक दरवर्षी येथे येत असतात. ग्रेनेडा आपल्या उत्पन्नातील मोठा खर्च शिक्षणावर करतो. हा देश वैद्यकीय शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे. अनेक देशातील विद्यार्थी येथे वैद्यकीय पदवी घेण्यासाठी येत असतात. दरम्यान, ग्रेनेडा देशाला कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागत नाही, अशातला भाग नाही. या देशासमोरही अनेक समस्या आहेत. मात्र, लष्कराशिवायही देश राहू शकतो याचं ग्रेनेडा हे उत्तम उदाहरण आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the country which dont have army