अजबच! मास्क घातले म्हणून जोडप्याला रेस्टॉरंटमधून काढले बाहेर

texas
texas twitter

वॉशिंग्टन डी. सी. : हॉटेलमध्ये नाईट आऊटसाठी गेलेल्या जोडप्याला हॉटेल मालकाने बाहेर काढले. यामागील कारण वाचून तुम्हालाही धक्का बसेल. कारण, त्या जोडप्याने आपल्या ४ महिन्याच्या बाळाला कोरोनापासून वाचविण्यासाठी मास्क घातले होते. त्यामुळे त्या जोडप्याला हॉटेल मालकाने बाहेर जाण्यास सांगितले. ही घटना अमेरिकेतील टेक्सॉस (Texas America) येथे घडली आहे.

texas
पाकिस्तानच्या तालिबान प्रेमामुळे सार्कची महत्त्वाची बैठक रद्द

सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, नताली वेस्टर आणि तिचा पती जोस लोपेझ गैरो यांना पहिल्यांदाच बाळ झालं. त्यामुळे कोरोना महामारीच्या काळात ते त्याला जपतात. ते कधीही मास्क न घालत घराबाहेर पडत नाहीत. मात्र, मंगळवारी बाळाला पाहण्यासाठी जोसची आई होती. त्यामुळे त्यांनी नाईट आऊटसाठी जाण्याचा निर्णय घेतला. दोघेही जवळच असलेल्या रेस्टॉरंट आणि बारमध्ये मित्रांसोबत नाईट आऊटसाठी गेले होते. पण, कोरोनाची महामारी सुरू असल्यामुळे त्यांनी मास्क घातले होते. तसेच त्यांच्या बाळाला सायस्टीक फायब्रोसिस नावाचा आजार आहे. त्यामुळे ते अधिकच काळजी घेतात. ते दोघेही रेस्टॉरंटमध्ये गेले तेव्हा त्यांना परिचारीकेने तपासून मास्क काढण्याची सूचना केली. मात्र, फक्त फेस आयडी तपासण्यासाठी मास्क काढण्यास सांगितले असावे, असे या जोडप्याला वाटले. मात्र, आत गेल्यानंतर जवळपास ३० मिनिटानंतर तेव्हा वेटरने देखील मास्क काढण्यास सांगितले. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर स्वतः मॅनजरने येऊन त्या जोडप्याला मास्क काढण्यास सांगितले. मात्र, मास्कशिवाय रेस्टॉरंट परिसरात वावरणे जोडप्याला धोकादायक वाटत होते. त्यामुळे त्यांनी नकार दिला. त्यानंतर त्यांना बाहेर काढण्यात आले.

रेस्टॉरंटची नो मास्क पॉलिसी -

रेस्टॉरंट मालकाला मास्कवर विश्वास नाही. तसेच देशात मास्कवरून फक्त राजकणार केले जाते, असे त्यांना वाटते. मी माझे पैसे या व्यवसायावर खर्च केले. मी माझे रक्त, घाम आणि अश्रू या व्यवसायासाठी खर्च केले. त्यामुळे मला इथं कोणतेही मास्क नकोत. अमेरिकेत मास्क घालणे हेच हास्यास्पद आहे, असे त्या हॉटेल मालक टॉमने सीएनएनसोबत बोलताना सांगितले.

यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने लसीकरण केलेल्या लोकांसाठी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, ज्या ठिकाणी अधिक संक्रमण असेल आणि रोगप्रतिकारशक्ती चांगली नसेल तर मास्क हे अनिवार्य करण्यात आले आहेत. मात्र, 10 मार्च रोजी, गव्हर्नर ग्रेग अॅबॉट यांनी टेक्सासमधील मास्कचा आदेश मागे घेतला आणि सांगितले की कोणत्याही प्रकारच्या व्यवसायांना 100% क्षमतेने उघडण्याची परवानगी आहे. न्यायाधीश कोविड -19 आदेशांचे पालन न करणाऱ्या लोकांना तुरुंगात टाकू शकत नाहीत, असेही ते म्हणाले. जर एखाद्या व्यक्तीने मास्क घातला नाही तर त्यांना दंडाला सामोरे जावे लागणार नाही, असेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com