मुलगी व्हावी म्हणून दिला तब्बल 14 मुलांना जन्म

प्रमोद सरवळे
Monday, 9 November 2020

सर्वात मोठा मुलगा टेलर हा सध्या 28 वर्षांचा आहे. टेलरनेही मॅगीच्या येण्याने आनंद व्यक्त केला आहे.

मिशिगन: मुलगी नको म्हणणाऱ्या जगात मुलगी व्हावी म्हणून एक नव्हे, दोन नव्हे तब्बल 14 अपत्यांनंतरही ज्यांची प्रतीक्षा थांबली नाही असे दाम्पत्य पृथ्वीवर अस्तित्वात आहे असे कोणी म्हटल्यास एखाद्याला कदाचित विश्वास बसणार नाही. मात्र, अमेरिकेतील केतेरी आणि जे स्क्वॉन्ड (Kateri and Jay Schwandt) हे दाम्पत्य याला अपवाद ठरले आहे. मुलगी जन्माला घालण्यासाठी या दाम्पत्याला तब्बल 14 अपत्यांची वाट पहावी लागली. 14 मुलांना जन्म दिल्यानंतर आता त्यांना मुलगी झाली असून आपण प्रचंड आनंदित असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली

लग्नापुर्वीच 3 मुलं-
14 मुलांनंतर मुलगी होईल असं या जोडप्याला पहिल्यांदा वाटलं नव्हतं. त्यांना वाटले होते 15 वे मुलही मुलगा होईल, त्यामुळे त्यांनी मुलगी झाली तर काय नाव ठेवायचे हे देखील ठरवले नव्हते. पण आता मुलगी झाल्यानंतर या दोघांनी या बाळाचे नाव मॅगी जेन (Maggie Jayne) ठेवलं आहे. मिशिगनमधील हे जोडपे कॉलेजकाळात Gaylord High School and Gaylord St. Mary’s या कॉलेजमध्ये भेटले होते. त्यानंतर दोघांनी 1993 मध्ये लग्न केलं होतं. विशेष म्हणजे यांचं लग्न होण्यापूर्वी या जोडप्याला 3 मुलं झाली होती. त्यांनतर आता मॅगीला धरून आता 15 मुलं झाली आहेत. 

Parents Finally Welcome Baby Girl After Having 14 Boys in a Row

हे वर्ष आनंदाचं!
याबद्दल बोलताना Jay Schwandt म्हणतो की, मॅगीचं आमच्या कुटुंबात आगमन झाल्याने आम्ही सर्वजण खूप आनंदी आहोत. हे वर्ष आमच्यासाठी खूप गोष्टींमुळे लक्षात राहण्यासारखं आहे, कारण आज मॅगी आल्याने आमचं कुटुंब परिपुर्ण झालं आहे.

मोठा मुलगा 28 वर्षांचा-
सर्वात मोठा मुलगा टेलर हा सध्या 28 वर्षांचा आहे. टेलरनेही मॅगीच्या येण्याने आनंद व्यक्त केला आहे. टेलरसह  Zach, Drew, Brandon, Tommy, Vinny, Calvan, Gabe, Wesley, Charlie, Luke, Tucker, Francisco, and Finley हे सगळ्या भावांनी मॅगीचं स्वागत केलं आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: couple have baby girl after 14 boys named maggie

Tags
टॉपिकस
Topic Tags: