Photo : 39 वर्ष 'मॅचिंग कपडे' घालणारं कपल..

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

प्रेम करण्याचा किंवा निभावण्याचं काही वय किंवा मर्यादा नसतं आणि हेच जपानमधील या जोडप्याने दाखवून दिलं आहे

प्रेमा करणं आणि निभावणं याला वयाची काही मर्यादा नसते. हेच जपानमधील एका जोडप्याने दाखवून दिलं आहे. 60 वर्षीय हे जोडपं  मागील 39 वर्षांपासून एकमेकांना सूट होतील असेच कपडे घालतात. त्यांच्या या सवयीने ते सोशल मीडियावरही प्रचंड फेमस आहेत. त्यांचे इन्स्टाग्रामवर अनेक चाहते आहेत. 

बॅान (पती) आणि पॅान (पत्नी) असं या दोघांचे नाव असून 1980 साली या दोघांचे लग्न झालं. तेव्हापासून आतापर्यंत हे दोघेही मॅचिंग कपडेच घालतात. दोघेही आपल्या या अनोख्या जीवनशैलीमुळे सोशल मीडियासह तरुणवर्गात प्रसिद्ध आहेत.

 

Image may contain: 2 people, people smiling, people standing

आपले वैवाहिक जीवन आणि वेगवेगळ्या प्रकारचे मॅचिंग कपड्यांच्या संग्रहाची त्यांनी दोन पुस्तके देखील छापली असून ही विक्रीसाठी उपलब्ध आहेत. निवृत्ती ही दुस-या जीवनाची सुरुवात असल्याचे त्यांनी या पुस्तकात म्हटलं आहे. 

इन्स्टाग्रामवर बॅानपॅान 511 नावाने प्रसिद्ध

जपानमधील हे जोडपे आपल्या इन्स्टाग्रामरील बॅानपॅान 511 या अकाऊंटमुळे चांगलेच प्रसिद्ध आहेत. विशेष म्हणजे त्यांचे 8 लाखांहून अधिक फॅालोवर्स देखील आहेत. बॅानपॅान 511 या नावाचा अर्थ असा आहे की, बॅान (पती) आणि पॅान (पत्नी) तर त्यांचे लग्न 5 नोव्हेंबर, 1980 रोजी झाले होते. त्यामुळे 5 तारीख आणि 11 वा महिना यानुसार 511 असे ठेवण्यात आले आहे.

Image may contain: 2 people, people smiling, people standing and text

WebTitle : couple wear matching cloths since last thirty nine years


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: couple wear matching cloths since last thirty nine years