हनीमूनसाठी गेले अन् झालं काय...

couple.jpg
couple.jpg

ऑकलँड : न्यूजीलंड हा एकदम छोटासा असणारा देश आहे. जगभरात खुश असणारा देश म्हणून न्यूजीलंडची ख्याती आहे. येथील सर्वच बीच पर्यटनासाठी खुप प्रसिद्ध आहेत. या बीचवर इतर देशातून देखील नागरिक पर्यटनासाठी येतात. नुकतेच एका बीचवर येथे एक दुर्घटना घडली. या घटनेची सोशल मिडीयावर जोरदार चर्चा आहे. 

दरम्यान, येथील व्हाइट आयलंडवर हनीमूनसाठी गेलेल्या अमेरिकेचे लॉरेन अरे (32) आणि मॅथ्यू उरे (36) ने सोमवारी व्हर्जिनिया, रिचमंड येथील घरी कुटुंबियांना फोन केला की, ते आयलंडवर आहेत, तेव्हा मॅथ्यू चेष्टेत म्हणाला, तो हे पाहून खुश आहे की, ज्वालामुखी सक्रिय नाही. त्यानंतर दुपारी ज्वालामुखीचा स्फोट झाला. त्यामध्ये या कपलला खूप भाजले. याची माहिती त्यांनी कुटुंबियांना रात्री एका व्हॉइस मेलने दिली. सोबतच जेवढे लवकर शक्य होईल तितक्या लवकर इतर माहिती देण्याचा प्रयत्न करू असे सांगितले. त्यानंतर कुटुंबाला कोणतीही सूचना मिळाली नाही.

32 वर्षांच्या लॉरेन उरे याची आई बारबरा बरहमने द वॉशिंग्टन पोस्टला हे सांगितले. मुलांना ज्वालामुखीमध्ये अचानक स्फोट होईल अशी अपेक्षा नव्हती. त्यामुळे त्यांनी तिथे जाण्याची योजना बनवली. हे कपल रॉयल कॅरेबियन क्रूज शिपने न्यूझीलंडच्या टोरांटो डॉकयार्ड येथे पोहोचले होते.

दरम्य़ान, ज्वालामुखी स्फोट झाल्यानंतर न्यूझीलंड क्रूज असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी केविन ओ'सुलीवन यांनी प्रवासी आणि त्यांच्या कुटुंबियांविषयी चिंता व्यक्त केली. अमेरिकी कुटुंबाचे म्हणणे आहे की, सध्या त्यांच्याकडे कोणतीही सूचना नाहीये की, त्यांची मुले कोणत्या परिस्थितीत आहेत.

त्यांना सोमवारी रात्री रॉयल कॅरेबियन इन्वेस्टिगेशनमधून मुलगी लॉरेनबद्दल कॉल आला होता. ज्यामध्ये कपल आयलँडवरून शिपवर परतले नसल्याची माहिती दिली गेली होती. त्यानंतर लॉरेनची आई बारबरा यांना मैथ्यूच्या आईने फोनवर व्हॉइसमेल आल्याचे सांगितले.

व्हाइट आयलंडवर सोमवारी दुपारी अचानक ज्वालामुखीमध्ये स्फोट झाला होता. यामध्ये 5 व्यक्तींचा मृत्यू झाला होता. मंगळवार दुपारपर्यंत 8 लोक बेपत्ता असल्याचे कळाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा ज्वालामुखी फुटला, तेव्हा त्याच्या आसपास 100 पेक्षा जास्त लोक होते.

न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्नने सांगितले की, ''या घटनेत अनेक लोक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यांना लवकरात लवकर जवळच्या शहरात पोहोचवले जाईल. अपघातग्रस्तांमध्ये जास्त लोक पर्यटकच आहेत.''

न्यूझीलंडची जिओसायन्स एजन्सी जीएनएसने सांगितले की, ज्वालामुखीचा स्फोट खूप कमी वेळेसाठी झाला होता. मात्र याचा धूर आणि राख आकाशात सुमारे 12 हजार फूट (3658 मीटर) उंच पोहोचली होती. मात्र आता हा ज्वालामुखी पुन्हा भडकण्याची शक्यता कमी आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com