Donald Trump: पॉर्न स्टार प्रकरणात अटकेनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची सुटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Donald Trump

Donald Trump: पॉर्न स्टार प्रकरणात अटकेनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची सुटका

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पॉर्न स्टारला अवैधरित्या पैसे दिल्याप्रकरणी मंगळवारी अटक करण्यात आली. दरम्यान मोठी अपडेट समोर आली आहे. अटकेनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची सुटका करण्यात आली आहे. (court released former us president donald trump )

अमेरिकेत २०१६ मध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीच्या काळात पोर्नस्टारला पैसे देऊन गप्प केल्याप्रकरणी गुन्हा नोंद झालेले माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मंगळवारी रात्री (भारतीय वेळेनुसार) अटक करण्यात आली होती. दरम्यान, हिंदी वृत्तसंस्थेनुसार अटकेनंतर ट्रम्प यांची सुटका करण्यात आली आहे.

युक्तिवाद ऐकल्यानंतर, न्यायालयाने ट्रम्प यांना सुमारे 1.22 लाख डॉलर दंड भरण्याचे आदेश दिले. दंडाची रक्कम स्टॉर्मी डॅनियल्सला दिली जाईल. याप्रकरणी पुढील सुनावणी ४ डिसेंबरला होणार आहे. त्याचबरोबर गुन्हेगारी प्रकरणात अटक होणारे ट्रम्प हे अमेरिकेचे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत.

याप्रकरणासंदर्भात बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी न्यायालयात स्वतःला निर्दोष घोषित केलं आहे. ट्रम्प यांनी दोषी नसल्याची कबुली दिली. त्यांनी हेराफेरीची 34 प्रकरणं चुकीची असल्याचं सांगितलं. सुनावणीनंतर ट्रम्प रात्री एक वाजण्याच्या सुमारास (भारतीय वेळेनुसार) कोर्टातून बाहेर पडले.

डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्व आरोप फेटाळले

हे प्रकरण राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या काही दिवसांआधीचं आहे. ऑक्टोबर 2016 च्या अखेरीस पॉर्न स्टार डॅनियल्सला त्याच्या तत्कालीन वैयक्तिक वकील मायकेल कोहेनच्या वतीनं 130,000 US डॉलर्सचं पेमेंट केल्या संबंधित आहे.

एका दशकापूर्वी ट्रम्प यांच्याशी असलेल्या कथित संबंधांबद्दल पॉर्न स्टारनं कोणताही खुलासा करु नये. तसेच याप्रकरणा संबंधात कोणतीही वाच्यता करु नये यासाठी ही रक्कम पॉर्न स्टारला पुरवल्याचा आरोप ट्रम्प यांच्यावर आहे. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत.

टॅग्स :Donald Trump