हाफिजला न्यायालयाचा दिलासा

हाफिजला न्यायालयाचा दिलासा

इस्लामाबाद : 26/11 च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदची जमात उद दवा आणि फलाही इन्सानियत फाउंडेशनला (एफआयएफ) काम सुरू ठेवण्याबाबत पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. 

एप्रिलममध्ये लाहोर न्यायालयाने या जमात उद दवा आणि फलाही इन्सानियत फाउंडेशनला काम सुरू ठेवण्याची परवानगी दिली होती. या निकालाविरुद्ध पाकिस्तान सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने हाफिजच्या बाजूने निकाल दिला. जमात उद दवांतर्गत पाकिस्तानात 300 मदरसे आणि शाळा, रुग्णालय, एक प्रकाशन संस्था आणि रुग्णवाहिका चालविण्यात येत असल्याचा दावा करण्यात आला.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर पाकिस्तान सरकारकडे आता कोणताच पर्याय राहिला नाही. तरीही पाकिस्तान सरकार या निर्णयाविरुद्ध पुनर्विचार याचिका दाखल करू शकते. कारण दहशतवाद्याच्या मुद्द्यावरून सरकार गंभीर असल्याचे जगाला दाखवणे पाकिस्तानला भाग आहे.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com