धक्कादायक! कर्मचाऱ्याचा मृतदेह झाकून, सुपरमार्कट ठेवलं सुरुच

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 22 August 2020

ब्राझीलमध्ये माणूसकीला काळीमा फासणारा प्रकार समोर आली आहे.

ब्राझीलीया- ब्राझीलमध्ये माणूसकीला काळीमा फासणारा प्रकार समोर आली आहे. सुपरमार्केटमधील एका कर्मचाऱ्याचा हर्ट अटॅकने मृत्यू झाला होता. अशावेळी सुपरमार्केट प्रशासनाने शॉप सुरु ठेवण्यासाठी कर्मचाऱ्याचा मृतदेह बॉक्स आणि छत्र्यांनी झाकून ठेवला. या धक्कादायक प्रकाराने सोशल मीडियावर संतापाची लाट पसरली आहे. त्यानंतर हा प्रकार चर्चेत आला आहे.

गणपतीच्या आरतीला हा धोका अटळ, काळजी घ्या, अन्यथा होऊ शकते दुर्घटना

सुपरमार्केटमध्ये सेल्स मॅनेजर असलेल्या Moises Santos चा 14 ऑगस्ट रोजी काम करत असताना हर्ट अॅटकने मृत्यू झाला. मृत कर्मचाऱ्याचा मृतदेह जमीनीवर पडल्याचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. कर्माचाऱ्याचा मृत्यू झाला असला तरी सुपर्कमार्केट सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी कर्मचाऱ्याचा मृतदेह शॉपमधील बॉक्स आणि छत्र्यांनी झाकण्यात आला. 

Imageकर्मचारी  Carrefour सुपरमार्केटमध्ये कामाला होता.  Carrefour प्रशासनाने या प्रकारानंतर माफी मागितली आहे. कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याला अशा प्रकारे हाताळायला नको होते, ताबडतोब शॉप बंद करायला हवं होतं. कर्मचाऱ्याला प्राथमिक मदत करण्यात आली होती. मात्र, मृतदेह न हलवण्याचा सूचना आम्हाला मिळाल्या होत्या. घडलेल्या प्रकारानंतर आम्ही प्रोटोकॉल बदलला आहे. त्यानुसार अशा अपवादात्मक स्थितीत शॉप बंद करण्याचा सुचना देण्यात आल्या आहे,  असं प्रशासनाने सांगितलं आहे. 

मुंबईत हायअलर्ट! दिल्लीत IS दहशतवाद्याला पकडल्यानंतर पोलिस यंत्रणेला सूचना

पीडितेच्या पत्तीने या प्रकारानंतर संताप व्यक्त केला आहे. मी संतापले आहे. सध्याच्या जगात मानसाच्या जीवाला काहीही किंमत राहिली नाही. लोकांना फक्त पैशांची काळजी लागली आहे, असं त्या म्हणाल्या आहेत.  Carrefour सुपरमार्केट 2018 मध्येही चर्चेत आले होते. सुपरमार्केटच्या सुरक्षा रक्षकाने एका कुत्र्याला शॉपमध्ये मरेपर्यंत मारलं होतं. त्यांनतर सोशल मीडियावर या प्रकरणावरुन मोठा गदारोळ झाला होता.

(edited by- kartik pujari)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: covered the man body with boxes and umbrellas