
गामालेया नॅशनल रिसर्च सेंटर फॉर इकोलॉजी अॅण्ड मॅथेमॅटिक्समध्ये वरिष्ठ संशोधक म्हणून काम करणारे 47 वर्षीय बोटिकोव्ह गुरुवारी त्यांच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळून आले होते.
Corona Vaccine : धक्कादायक! कोरोनाची लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञाची बेल्टनं गळा आवळून हत्या
Coronavirus Vaccine : रशियाची कोविड-19 लस 'स्पुतनिक व्ही' (Sputnik V Vaccine) विकसित करणार्या शास्त्रज्ञांपैकी एक आंद्रे बोटिकोव्ह (Andrey Botikov) यांची त्यांच्या राहत्या घरी बेल्टनं गळा आवळून हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला अटक केलीये.
रशियन मीडियानं याबाबतची माहिती दिली आहे. रशियन वृत्तसंस्था 'टास'नं तपास समितीच्या (Investigative Committee of Russian Federation) हवाल्यानं म्हटलंय की, गामालेया नॅशनल रिसर्च सेंटर फॉर इकोलॉजी अॅण्ड मॅथेमॅटिक्समध्ये वरिष्ठ संशोधक म्हणून काम करणारे 47 वर्षीय बोटिकोव्ह गुरुवारी त्यांच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळून आले होते.
रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी 2021 मध्ये कोविड लसीवरील कामाबद्दल बोटिकोव्ह यांना 'ऑर्डर ऑफ मेरिट फॉर द फादरलँड' पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. अहवालानुसार, 2020 मध्ये 'स्पुतनिक V' लस विकसित करणाऱ्या 18 शास्त्रज्ञांपैकी बोटिकोव्ह एक होते.
या प्रकरणाची चौकशी करणार्या समितीनं टेलिग्रामवर दिलेल्या निवेदनात म्हटलंय, हत्येचा गुन्हा म्हणून तपास केला जाईल. तपासकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, 29 वर्षीय तरुणानं एका भांडणाच्या वेळी बोटिकोव्ह यांचा बेल्टनं गळा दाबला आणि तेथून त्यानं पळ काढला. फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीनुसार, त्या संशयिताला अटक करण्यात आलीये.